तिमिरातुनी तेजाकडे…

तिमिरातुनी तेजाकडे ने दीपदेवा जीवना ॥

तिमिरातुनी तेजाकडे…

तिमिरातुनी तेजाकडे…

तिमिरातुनी तेजाकडे

ने दीपदेवा जीवना ॥

 

ज्योतीपरी शिवमंदिरी

रे जागवी माझ्या मना ॥

 

दे मुक्तता, भयहीनता

अभिमान दे, दे लीनता

दे अंतरा शुभदायिनी

मलयनिलासम भावना ॥

 

-कुसुमाग्रज