400 वर्षे जुन्या वटवृक्षाची जनुकीय जपणूक करण्याची मुहूर्तमेढ

 वटपौर्णिमेच्या दिवशी सुमनताई खाडे यांचेकडून संपन्न सोनी वार्ताहर भोसे (ता. मिरज) येथील 400 वर्षे जुना ऐतिहासिक वटवृक्ष नुकताच उन्मळून पडला आहे, त्यानंतर पर्यावरण प्रेमींनी हा वटवृक्ष जतन करण्यासाठी पुढाकार घेतला असून, पर्यावरण प्रेमींनी त्याच ठिकाणी फांद्या छाटून जतन करण्याचा निर्णय घेतला. तर वटवृक्षाच्या फांद्या जिह्यातील 750 गावात लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची पाहणी करून आल्यानंतर […]

400 वर्षे जुन्या वटवृक्षाची जनुकीय जपणूक करण्याची मुहूर्तमेढ

 वटपौर्णिमेच्या दिवशी सुमनताई खाडे यांचेकडून संपन्न
सोनी वार्ताहर
भोसे (ता. मिरज) येथील 400 वर्षे जुना ऐतिहासिक वटवृक्ष नुकताच उन्मळून पडला आहे, त्यानंतर पर्यावरण प्रेमींनी हा वटवृक्ष जतन करण्यासाठी पुढाकार घेतला असून, पर्यावरण प्रेमींनी त्याच ठिकाणी फांद्या छाटून जतन करण्याचा निर्णय घेतला. तर वटवृक्षाच्या फांद्या जिह्यातील 750 गावात लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची पाहणी करून आल्यानंतर सुमनताई खाडे यांनी उन्मळून पडलेल्या वटवृक्षाची जनुकीय जपणूक करण्याचा मुहूर्तमेढ वटपौर्णिमेच्या दिवशी करण्याचे ठरवले होते.
याचा पाठपुरावा घेत आज सौ. खाडे यांनी पर्यावरण प्रेमी प्रवीण शिंदे व मुस्तफा मुजावर यांच्याकडे या वृक्षाच्या पुनर्वसनासाठी रोख रक्कम देऊन तसेच महिलांना वडाची रोपे भेट देत अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली. तसेच पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. सध्या या ऐतिहसिक वटवृक्षाची जनुकीय जपणूक होणार असल्याचेही सांगितले. त्याकामी पालकमंत्री खाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या गतप्राण झालेल्या वटवृक्षाच्या फांद्या जिल्ह्यातील गावकऱ्यांना द्यायच्या व त्याची निगा व काळजी घेण्राया लोकांना पुढील वाढदिवसाला पुरस्कार द्यायचा. या उपक्रमाची लवकरच सुऊवात होणार असल्याचेही सांगण्यात आले.
यावेळी माजी सभापती सुरेश आवटी, निसर्ग मित्र प्रवीण शिंदे, मुस्तफा मुजावर, भारतीय जनता पार्टी पदाधिकारी मनोज पाटील, जयश्रीताई दाभाडे, शैलजा शिंदे, सुनीता सातपुते, विद्याताई ओवाळे (ग्रामपंचायत सदस्या) सीमा जगदाळे (ग्रामपंचायत सदस्या) उर्वशी जाधव, सिंधुताई जाधव, उज्वला घोरपडे, विमल जाधव, वैशाली पाटील, सुवर्णा खामकर, सुनंदा खामकर, सरिता खामकर, वैशाली खामकर, उषा कदम, यलामा देवीचे पुजारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचाही पुढाकार
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडामिसे यांनी या वटवृक्षच्या फांद्या प्रत्येक ग्रामपंचायतीला देऊन त्याची जपणूक करण्याची जबाबदारी घेत असल्याचे जाहीर केलं आहे. त्याच बरोबर पालकमंत्री खाडे यांनी देखील आता या वृक्षाच्या जनुकांचा वापर करून काही वृक्ष बनवून ते जपण्यासाठी देण्याची जबाबदारी घेतली आहे, तर काही संस्थांनी याबाबत सकारात्मकता दाखवली आहे.