स्वयंभू गणेश मंदिर महिला मंडळातर्फे तिळगूळ कार्यक्रम
बेळगाव: स्वयंभू गणेश मंदिर महिला मंडळातर्फे तिळगूळ व हळदी-कुंकू कार्यक्रम नुकताच पार पडला. प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर शोभा सोमणाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, त्रिशल बागी उपस्थित होत्या.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुधीर घोडगे यांनी परिचय करून दिला. प्रास्ताविक व स्वागत अध्यक्षा सुलभा भोसले यांनी केले. यावेळी महापौर म्हणाल्या, राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविण्यासाठी महिलांनी संघटित होणे गरजेचे आहे. उपमहापौरांनीही आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी सविता जोशीलकर, अनुराधा गवळी, रत्ना गवळी उपस्थित होत्या. मनीषा जाधव यांनी आभार मानले.