Sangli News : कृष्णानदीकाठी रंगला बोटींगचा थरार : राज्यातून 100 महिला खेळाडूंचा सहभाग

                   सांगलीत अस्मिता लीग कयाकिंग-कनोईग राज्यस्तरीय स्पर्धेला उत्साहात सुरुवात सांगली : अस्मिता लीग कयाकिंग अँड कनोईग राज्यस्तरीय स्पर्धा २०२५ चे उद्घाटन शनिवारी सकाळी ११ वाजता कृष्णा नदीकाठी रॉयल कृष्णा बोट क्लब, वसंतदादा स्मारक येथे उत्साहात पार पडले. माननीय आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते ध्वज दाखवून आणि हवेत […]

Sangli News : कृष्णानदीकाठी रंगला बोटींगचा थरार : राज्यातून 100 महिला खेळाडूंचा सहभाग

                   सांगलीत अस्मिता लीग कयाकिंग-कनोईग राज्यस्तरीय स्पर्धेला उत्साहात सुरुवात
सांगली : अस्मिता लीग कयाकिंग अँड कनोईग राज्यस्तरीय स्पर्धा २०२५ चे उद्घाटन शनिवारी सकाळी ११ वाजता कृष्णा नदीकाठी रॉयल कृष्णा बोट क्लब, वसंतदादा स्मारक येथे उत्साहात पार पडले. माननीय आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते ध्वज दाखवून आणि हवेत फुगे सोडून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरुडेकर, पृथ्वीराज पवार, श्रीमती नीता केळकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी आमदार सुधीर गाडगीळ यांनी महाराष्ट्रातील सर्व महिला खेळाडूंना शुभेच्छा देत अस्मिता लीगसारख्या उपक्रमांमुळे वॉटर स्पोर्ट्सला मोठे व्यासपीठ मिळणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, भारतात प्रथमच अशा प्रकारची महिला वॉटर स्पोर्ट्स लीग आयोजित होत असून राज्यातील विविध जिल्ह्यांमधून शंभरहून अधिक महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
लीगसाठी महाराष्ट्रातील पवित्र नद्यांची नावे वापरून संघांची स्थापना करण्यात आली असून कृष्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, गोदावरी अशा नद्यांच्या नावाने संघ मैदानात उतरले. प्रत्येक संघाने उत्कृष्ट कौशल्य दाखवून अंतिम फेरीत स्थान मिळवले असून रविवारी अंतिम सामने रंगणार आहेत.
स्पर्धेच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी नारायण कोरबार, अर्जुन पाटील, प्रसाद जामदार, आदित्य पाटील तसेच संघटनेचे पदाधिकारी आणि रॉयल कृष्णा बोट क्लबचे भरत बर्गे, हरीश पाटील, दीपक पाटील, विनोद नलावडे, अर्चना पाटील यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. पंच म्हणून बिराज जाधव, छत्रपती पुरस्कार विजेते देवेंद्र सुर्वे, सांगलीचे छत्रपती पुरस्कार विजेते अंकुश पावटे, आंतरराष्ट्रीय खेळाडू मनीषा माळी, अश्विनी वागरकर यांचीही उपस्थिती होती.
यावेळी भारती दिगडे, ऊर्मिला बेलवलकर, स्वाती शिंदे, ?ड. मीनल पाटील, उद्योजिका स्मिता देशमुख अनुराधा मोहिते, अविनाश मोहिते, शरद देशमुख, विजय साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. राज्य संघटनेचे उपाध्यक्ष प्रताप जामदार, सचिव सुरेंद्र कोरे तसेच इंडियन फेडरेशनचे सहसचिव आणि आंतरराष्ट्रीय पंच दत्ता पाटील यांनीही उपस्थित राहून स्पर्धेचे उद्घाटन सोहळा अधिक शोभिवंत केला. स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होती.