नाशिकात तीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका 3 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून नंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गाव शोकाकुल झाले आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ALSO READ: मुंबईत कर्मचाऱ्याला सहकाऱ्याने मारहाण करून केली हत्या

मिळालेल्या वृत्तानुसार, त्याच गावातील रहिवासी 24 वर्षीय विजय संजय खैरनार याने प्रथम मुलीवर बलात्कार केला आणि नंतर तिचे डोके दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या केली.

ALSO READ: धुळे : आदिवासी वसतिगृहात नर्सिंगच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार, गावात राहणाऱ्या आरोपीचे मयत मुलीच्या वडिलांशी महिन्याभरापूर्वी भांडण झाले. मुलीच्या वडिलांना धडा शिकवण्याचा राग डोक्यात घेऊन आरोपीने घराच्या बाहेर खेळणाऱ्या मुलीला पळवून नेले आणि तिच्यावर बलात्कार केला नंतर मुलीचे डोके दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या केली. 

ALSO READ: १६ वर्षांनंतर मुलाने घेतला वडिलांच्या हत्येचा बदला; नांदेड मधील घटना

चिमुकली बेपत्ता झाल्याने तिच्या शोधात ग्रामस्थ लागले चिमुकली एका ठिकाणी गंभीर अवस्थेत आढळली. तिला तातडीने डॉक्टर कडे नेले. डॉक्टरांनी तिला पाहता मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून अवघ्या अर्ध्यातासात पोलिसांनी आरोपीला अटक केली . आरोपीला भर चौकात फाशी देण्याची मागणी गावकरी करत आहे. 

Edited By – Priya Dixit

Go to Source