तामिळनाडू खाणस्फोटात तीन कामगारांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूतील विऊधुनगर जिल्ह्यातील करियापट्टी भागात दगडाच्या खाणीत झालेल्या स्फोटात तीन जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी सकाळी ही घटना घडली. दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. तसेच अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी हजर झाले होते. या स्फोटामागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास सुरू केला आहे. या दुर्घटनेपूर्वी मंगळवारी संध्याकाळी तामिळनाडूमध्ये झालेल्या आणखी एका रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता, तर 15 जण जखमी झाले होते. सेलममधील येरकौड घाट रोडवर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस दरीत कोसळली होती.
Home महत्वाची बातमी तामिळनाडू खाणस्फोटात तीन कामगारांचा मृत्यू
तामिळनाडू खाणस्फोटात तीन कामगारांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ चेन्नई तामिळनाडूतील विऊधुनगर जिल्ह्यातील करियापट्टी भागात दगडाच्या खाणीत झालेल्या स्फोटात तीन जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी सकाळी ही घटना घडली. दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. तसेच अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी हजर झाले होते. या स्फोटामागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास सुरू केला […]