सर्पदंशामुळे तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

ओडिशातील बौद्ध जिल्ह्यात रविवारी रात्री एकाच कुटुंबातील तीन सक्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. तर वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी ही माहिती दिली.

सर्पदंशामुळे तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

ओडिशातील बौद्ध जिल्ह्यात रविवारी रात्री एकाच कुटुंबातील तीन सक्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. तर वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. 

ही घटना टिकरपाडा पंचायत क्षेत्रातील चारियापाली गावात रविवारी रात्री घटली. सुरेंद्र मलिक हे आपल्या कुटुंबासह झोपले होते रात्री अचानक त्यांच्या मुलीची तब्बेत बिघडली. त्यामुळे सर्व कुटुंब जागे झाले. मुलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला जवळच एक साप जाताना दिसला. सापाने त्यांच्या तिन्ही मुलींना आणि त्यांना दंश केला. त्यांनी पत्नीला आवाज देऊन तातडीने बोलाविले.

चौघांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिन्ही मुलींना मृत घोषित करण्यात आले तर सुरेंद्र यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. क्रेट सापाने दंश केल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 

Edited by – Priya Dixit 

Go to Source