फोंड्यातील तीन पोलीस निलंबित
दक्षिण गोव्याच्या अधीक्षक सुनीता सावंत यांचा आदेश : कन्हैयाकुमार मंडल खून प्रकरणी निष्काळजी भोवली
मडगाव : लोटली येथील कथित हिट अँड रन प्रकरणात बिहार येथील कन्हैयाकुमार मंडल याला मृत्यू आला होता. हे प्रकरण आता फोंडा पोलिसांना बरेच भोवले असून फोंडा पोलिसस्थानकाच्या रॉबर्ट पथकातील तिघांच्या निलंबनाचा आदेश काल गुऊवारी सायंकाळी दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी जारी केला आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये हेड कॉन्स्टेबल रवींद्र पी. नाईक (फोंडा पोलिसस्थानक), कॉन्स्टेबल अश्विन व्ही. सावंत (एसपीसीआर पणजी-रॉबर्ट वाहन फोंडा) व चालक प्रीतेश एम. प्रभू (एसपीआर पणजी-रॉबर्ट वाहन फोंडा) यांचा समावेश आहे. निलंबित करण्यात आलेल्या तिन्ही पोलिस कर्मचाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी केली जाणार असून तिघांचीही फोंड्यातून दक्षिण गोवा मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.
‘हिट अँड रन’चा बनाव
गेल्या मंगळवारी रात्री फोंडा पोलिसस्थानकाच्या रॉबर्ट गाडीतून मूळ बिहार येथील असलेल्या कन्हैया याला फोंड्याहून लोटलीत आणून सोडले होते. त्याला लोटलीत सोडले जाणार असल्याची कोणतीच कल्पना रॉबर्ट पथकातील हवालदारांनी आपल्या वरिष्ठांना दिली नव्हती. त्यात एका पोलिसस्थानकाची रॉबर्ट व्हॅन दुसऱ्या पोलिसस्थानकाच्या हद्दीत नेता येत नाही असा नियम असताना देखील फोंडा पोलिसांच्या रॉबर्ट व्हॅनने मायणा-कुडतरी पोलिस स्थानकाच्या हद्दित प्रवेश केला होता. हा रॉबर्ट पथकाचा निष्काळजीपणा होता. त्याचा ठपका निलंबित करण्यात आलेल्या हवालदारांवर ठेवण्यात आलेला आहे.
ट्रक जप्त, चालक गायब
लोटली येथील कथित हिट अँड रन प्रकरणातील ट्रक मायणा-कुडतरी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मात्र, चालक अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांनी ट्रकच्या मालकाशी संपर्क साधला असून आज शुक्रवारी किंवा उद्या शनिवारी त्याला मायणा-कुडतरी पोलिस त्याला ताब्यात घेणार आहे. दरम्यान, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. मधु घोडकिरेकर यांनी मायणा-कुडतरी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ट्रकची काल गुऊवारी तपासणी केली. उपअधीक्षक संतोष देसाई यांनी वाहनाचा पत्रा लागून कन्हैया याचा गळा चिरला गेला असावा, अशी शक्यता व्यक्त केली होती. त्यामुळे डॉ. घोडकिरेकर यांनी काल ट्रकची तपासणी केली. कन्हैयाचा नेमका खून कोणी केला याचा तपास करण्याचे मोठे आव्हान आता मायणा-कुडतरी पोलिसांसमोर आहे. त्यात ट्रकचालकाची जबानीही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आता मायणा-कुडतरी पोलिस कन्हैयाच्या खुन्यापर्यंत कसे पोहोचतात हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
‘हिट अँड रन’ नव्हे, कन्हैयाचा खूनच
कन्हैयाकुमार मंडल याच्या गळ्यावर तसेच हातावर आणि पोटावर धारधार शस्त्राने वार करून त्याचा खून केला आणि नंतर कथित ‘हिट अँड रन’ प्रकरण घडविण्यात आले. शवचिकित्सेतून हे खून प्रकरण उघडकीस आले. अन्यथा हे प्रकरण हिट अँड रन म्हणूनच पोलिस दप्तरात नोंद झाले असते. कथित ‘हिट अँड रन’ प्रकरणाचा तऊण भारतने सातत्याने पाठपुरावा केला. फोंडा पोलिसांच्या कृतीबद्दल संशय व्यक्त केला जात होता. तो अखेर खरा ठरला व तिघा पोलिसांच्या निलंबनाचा आदेश निघाला.
Home महत्वाची बातमी फोंड्यातील तीन पोलीस निलंबित
फोंड्यातील तीन पोलीस निलंबित
दक्षिण गोव्याच्या अधीक्षक सुनीता सावंत यांचा आदेश : कन्हैयाकुमार मंडल खून प्रकरणी निष्काळजी भोवली मडगाव : लोटली येथील कथित हिट अँड रन प्रकरणात बिहार येथील कन्हैयाकुमार मंडल याला मृत्यू आला होता. हे प्रकरण आता फोंडा पोलिसांना बरेच भोवले असून फोंडा पोलिसस्थानकाच्या रॉबर्ट पथकातील तिघांच्या निलंबनाचा आदेश काल गुऊवारी सायंकाळी दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी जारी केला आहे. निलंबित […]