गणेशपुरी हल्ल्यातील आणखी तिघांच्या आवळल्या मुसक्या
सूत्रधार आरकेसह अन्य दोघे फरार : आतापर्यंत सहाजण गजाआड
म्हापसा : गणेशपुरी-म्हापसा येथे गेल्या गुऊवारी झालेल्या प्राणघातक खुनी हल्ल्यात अहमद देवडी व संदेश साळकर यांना जखमी करणाऱ्या हल्लेखोरांपैकी उर्वरीत तिघांना म्हापसा पोलिसांनी काल शुक्रवारी गजाआड केले. शरबस्सू गायकवाड (26), नागराज पुजारी (19) व विरेश सतीश पुजारी (38) यांना अटक करण्यात म्हापसा पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत सहाजणांना अटक झाली आहे. अटक केलेल्या या तिघानाही दुपारी येथील जिल्हा सत्र न्यायालयात रिमांडसाठी हजर केले असता तिघानांही 6 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
या खुनी हल्लाप्रकरणातील सूत्रधार रामकृष्ण भालेकर उर्फ आरके हा अद्याप फरारी असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. पोलिसांनी श्वानपथक तसेच ठसे तज्ञांचा वापर पंचनाम्यावेळी केला होता. म्हापसा पोलिसांनी याप्रकरणी भा.दं.संच्या 307 व 34 कलमांतर्गत प्राणघातक हल्याचा गुन्हा नोंद केला आहे. निरीक्षक निखिल पालयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाबलो परब अधिक तपास करीत आहेत. या हल्ल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी यापुर्वी घटनेच्या अवघ्या काही तासांतच तीन संशयितांना अटक केली होती. अटक केलेल्यांमध्ये मंथन च्यारी, श्रीधर किल्लेदार, अभिषेक पुजारी यांचा समावेश होता. काल अन्य तिघांना अटक झाल्याने याप्रकरणी आतापर्यंत एकूण सहाजण गजाआड झालेले आहेत.
Home महत्वाची बातमी गणेशपुरी हल्ल्यातील आणखी तिघांच्या आवळल्या मुसक्या
गणेशपुरी हल्ल्यातील आणखी तिघांच्या आवळल्या मुसक्या
सूत्रधार आरकेसह अन्य दोघे फरार : आतापर्यंत सहाजण गजाआड म्हापसा : गणेशपुरी-म्हापसा येथे गेल्या गुऊवारी झालेल्या प्राणघातक खुनी हल्ल्यात अहमद देवडी व संदेश साळकर यांना जखमी करणाऱ्या हल्लेखोरांपैकी उर्वरीत तिघांना म्हापसा पोलिसांनी काल शुक्रवारी गजाआड केले. शरबस्सू गायकवाड (26), नागराज पुजारी (19) व विरेश सतीश पुजारी (38) यांना अटक करण्यात म्हापसा पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत […]