कंकणवाडीजवळील अपघातात तिघे ठार
वार्ताहर /कुडची
दोन मोटारसायकल मध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तिघे ठार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी कंकणवाडी (ता. रायबाग) येथे घडली. सुखदेव रायप्पा पुजारी (वय 60), सदाशिव हणमंत दोडमनी व किरण सदाशिव दोडमनी, दोघेही रा. चिम्मड अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. या घटनेत एक लहान मुलगाही गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. रायबाग तालुक्यातील कंकणवाडी येथील लक्ष्मी नगरजवळ मुधोळ-निपाणी रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर झाली. कंकणवाडीकडून चिम्मड गावाकडे जाणारी दुचाकी आणि कंकणवाडीकडे येणाऱ्या दुचाकींची समोरासमोर जोरात धडक झाली. दोन्ही वाहनांची धडक इतकी भीषण होती की दोन्ही दुचाकींच्या समोरचा भाग चक्काचूर होऊन पडला होता. दोन्ही मोटारसायकलच्या धडकेत तिघेही जागीच ठार झाले होते. तर मुलगा जखमी असून त्याच्यावर महालिंगपूर येथे उपचार सुरू आहेत. घटनास्थळी रायबाग पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठविले. याप्रकरणी रायबाग पोलिसांत नोंद झाली आहे.
Home महत्वाची बातमी कंकणवाडीजवळील अपघातात तिघे ठार
कंकणवाडीजवळील अपघातात तिघे ठार
वार्ताहर /कुडची दोन मोटारसायकल मध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तिघे ठार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी कंकणवाडी (ता. रायबाग) येथे घडली. सुखदेव रायप्पा पुजारी (वय 60), सदाशिव हणमंत दोडमनी व किरण सदाशिव दोडमनी, दोघेही रा. चिम्मड अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. या घटनेत एक लहान मुलगाही गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. रायबाग तालुक्यातील […]
