सुर्ल, शिर्ली, पर्वरीतील अपघातांत तीन ठार

सुर्लात म्हशी आडव्या आल्याने अपघात : शिर्लीत कारचालकाची झाडाला धडक,पर्वरी येथे टक्करीत केटीएमचालक ठार
डिचोली, पर्वरी, मडगाव : मडगावहून कुंकळीच्या दिशेने जात असलेल्या कारची जबरदस्त धडक शिर्ली -धर्मापूर परिसरातील रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडाला बसल्यामुळे युवक ठार झाला असून त्याचे नाव सत्त्या तोमर (29 वर्षे) असे आहे. सुकूरमध्ये दोन दुचाकींमध्ये टक्कर होऊन केटीएम मोटरसायकलचाल राहूल खलप (31 वर्षे, सुकूर) याचा मृत्यू झाला, तर रितेश कांबळी (46 वर्षे) जखमी झाला आहे. सुर्ल सांखळी येथील अपघातात माजी पंचसदस्य तथा उत्कृष्ठ समाजकार्यकर्ता प्रशांत रघुनाथ नाईक गावकर (वय 59 वर्षे) यांना मृत्यू आला. प्राप्त माहितीनुसार शिर्ली येथील अपघातात सत्त्या तोमर हा युवक मडगावहून कुंकळीच्या दिशेने जात असताना वाहनचालकाचा तोल गेल्याने हा अपघात घडला. अपघातात तो गंभीररित्या जखमी झाला. अपघाताची वेळ मध्यरात्रीनंतरची असल्यामुळे बहुतेक हा युवक जखमी स्थितीत बराच वेळ घटनास्थळीच पडलेला असावा. या जखमी युवकाला सरकारी इस्पितळात नेण्यात आले तेव्हा ‘मृतावस्थेत आणले’ अशी ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी नोंद केली आहे. अपघात मध्यरात्रीनंतर पहाटेच्या अंधारात घडला तेव्हा घटनास्थळी कोणी नव्हते. मात्र तपास यंत्रणेने काही अंदाज बांधलेले आहेत. एक तर या कारचालकाला डुलकी लागली असावी किंवा समोरुन येणाऱ्या वाहनाच्या एलईडी लाईटीचा dरप्रकाशझोत डोळ्यावर बसल्यामुळे ही दुर्घटना घडलेली असावी. यदाकदाचित कार चालकाला डुलकी लागली तर त्या कार चालकाने आपली कार बाजुला घेऊन थोडा वेळ आराम करुन नंतर वाहन चालविणे अधिक सोयीचे ठरते, अशी प्रतिक्रिया मडगाव वाहतूक पोलीस निरीक्षक सचिन दळवी यांनी व्यक्त केली. दरम्यान, धर्मापूर-शिर्ली-कुंकळीपर्यंतचा महामार्ग वाहतुकीच्या आणि अपघाताच्यादृष्टीने अत्यंत धोकादायक बनलेला असल्याची सर्वसामान्यांची तक्रार असून प्रशासनाने या रस्त्याचे लवकरात लवकर रुंदीकरण करणे अत्यंत आवश्यक असल्याची गरज व्यक्त केली आहे.
सुकूर अपघातात केटिएमचालक ठार
सुकूरमध्ये दोन दुचाकींमध्ये टक्कर होऊन एका युवकाचा मृत्यू तर दुसरा जखमी झाल्याची नोंद पर्वरी पोलिसस्थानकात करण्यात आली आहे. निरीक्षक राहुल परब यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे रविवारी मध्यरात्रीनंतर गोमेकॉमधून पर्वरी पोलीस स्थानकात दूरध्वनीद्वारे दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघाताची माहिती देण्यात आली. राहुल खलप (31, सुकूर) या युवकाचा मृतदेह आणला असून दुसरा रितेश कांबळी (46) याला जखमी अवस्थेत इस्पितळात उपचारासाठी दाखल केल्याचा संदेश पर्वरी पोलिसांना आला होता. त्या संदेशानुसार साहाय्यक उपनिरीक्षक रेडकर यांनी अपघाताचे प्रकरण नोंदवले आहे. राहुल हा आपल्या केटीएम मोटारसायकल क्र. जीए-03 एएन-7029 ने जात असता समोरून येणाऱ्या रितेश कांबळी चालवत असलेल्या हिरो होंडा या दुचाकीची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात राहुल याचा मृत्यू झाला. उपनिरीक्षक सर्वेश भांडारी पुढील तपास करीत आहेत.
सुर्ल अपघातात समाजकार्यकर्ता गेला
सांखळी मतदारसंघातील सुर्ल पंचायतीचे माजी पंचसदस्य गावकरवाडा सुर्ल येथील प्रशांत रघुनाथ नाईक गावकर (वय 59 वर्षे ) यांचे काल सोमवारी दुपारी घडलेल्या स्वयं अपघातात निधन झाले. सुर्ल येथील दुग्ध सोसायटीजवळच रस्त्यावर म्हशी आडव्या आल्याने हा अपघात घडला. प्रशांत हे आपल्या जीए 05 एन 1383 क्रमांकाच्या होंडा ग्रेझिया या दुचाकीने येत असताना रस्त्यावर अचानक म्हशी आल्या. त्यांना जोरदार धडक दिल्याने ते दुचाकीसह रस्त्यावर पडले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना इस्पितळात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डिचोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलीस निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विराज धावसकर अधिक तपास करीत आहे. मयत प्रशांत नाईक गावकर हे विद्यमान पंचसदस्या सुचिता गावकर यांचे पती होत. ते एक उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांना दोन मुले आहेत.

Home महत्वाची बातमी सुर्ल, शिर्ली, पर्वरीतील अपघातांत तीन ठार
सुर्ल, शिर्ली, पर्वरीतील अपघातांत तीन ठार
सुर्लात म्हशी आडव्या आल्याने अपघात : शिर्लीत कारचालकाची झाडाला धडक,पर्वरी येथे टक्करीत केटीएमचालक ठार डिचोली, पर्वरी, मडगाव : मडगावहून कुंकळीच्या दिशेने जात असलेल्या कारची जबरदस्त धडक शिर्ली -धर्मापूर परिसरातील रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडाला बसल्यामुळे युवक ठार झाला असून त्याचे नाव सत्त्या तोमर (29 वर्षे) असे आहे. सुकूरमध्ये दोन दुचाकींमध्ये टक्कर होऊन केटीएम मोटरसायकलचाल राहूल खलप […]
