कक्केरी येथील शेतकऱ्याचे तीन एकरमधील ऊस जळून खाक

खानापूर : तालुक्यातील कक्केरी येथील उसाच्या मळ्याला शॉर्टसर्किटसने दोन दिवसापूर्वी आग लागून तीन एकर जमिनीतील ऊस जळून खाक झाले. या घटनेत शेतकरी रविंद्र आप्पया डोलीनावर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कक्केरी येथील शेतकरी रविंद्र डोलीनावर यांच्या शेतातून वीजवाहिन्या गेल्या आहेत. दोन दिवसापूर्वी शॉर्टसर्किट होऊन ठिणगी उसाच्या शेतात पडल्याने भर दुपारी उसाने पेट घेतली. शेजारील […]

कक्केरी येथील शेतकऱ्याचे तीन एकरमधील ऊस जळून खाक

खानापूर : तालुक्यातील कक्केरी येथील उसाच्या मळ्याला शॉर्टसर्किटसने दोन दिवसापूर्वी आग लागून तीन एकर जमिनीतील ऊस जळून खाक झाले. या घटनेत शेतकरी रविंद्र आप्पया डोलीनावर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कक्केरी येथील शेतकरी रविंद्र डोलीनावर यांच्या शेतातून वीजवाहिन्या गेल्या आहेत. दोन दिवसापूर्वी शॉर्टसर्किट होऊन ठिणगी उसाच्या शेतात पडल्याने भर दुपारी उसाने पेट घेतली. शेजारील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती हेस्कॉमला दिली. आणि वीजपुरवठा बंद करण्यास सांगितले. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र आग आटोक्यात न आल्याने तीन एकर जागेतील ऊस जळून खाक झाले आहेत. तसेच शेतातील घरातील साठवून ठेवलेले धान्य व शेतीसाठी लागणारे साहित्य तसेच पाणीपुरवठ्यासाठी जमा केलेले पाईपही या आगीत जळून खाक झाले आहेत.    त्यामुळे रविंद्र डोलीनावर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.