बाणेर पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

पुण्यातील बाणेर परिसरातील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा निनावी फोन आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पासपोर्ट कार्यालयातील कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी शोध घेण्यास सुरु …

बाणेर पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

पुण्यातील बाणेर परिसरातील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा निनावी फोन आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पाडपोर्ट कार्यालयातील कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी शोध घेण्यास सुरु केले आहे. 

ALSO READ: पुणे स्पा सेंटरवर छापा; घाबरलेल्या महिलेने इमारतीवरून उडी मारल्याने मृत्यू

मिळालेल्या माहितूनुसार, बाणेर येथील पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकृत फोनवर एक निनावी फोन ला आणि फोनवर अज्ञाताने आक्रमक भाषेत बोलत हे कार्यालय उडवून देणार अशी धमकी दिली. अचानक असा फोन आल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित या घटनेची माहिती पुणे पोलिसांना दिली, त्यानंतर पोलीस प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या.

ALSO READ: शरद पवार यांची प्रकृती उत्तम; हॉस्पिटलमधून डिस्चार्ज केलं
धमकीचा फोन आल्यावर तातडीने पोलीस प्रशासन सक्रिय झाला आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेसह बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने खबर्दारी म्हणून संपूर्ण परिसर रिकामे केले आणि परिसराची कसून तपासणी करण्यात आली. तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. पोलिसांनी नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

ALSO READ: जांभूळवाडी पुला जवळ ट्रकचा अपघात, क्लिनर व चालकाचा मृत्यू

या गंभीर प्रकरणी पुणे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ज्या क्रमांकावरून हा धमकीचा फोन आला होता, त्या मोबाइल क्रमांकाचे लोकेशन ट्रॅक करण्याचे काम सायबर पोलीस आणि तांत्रिक विभागामार्फत सुरू आहे. हा फोन खोडसाळपणाने केला होता की यामागे काही मोठे षडयंत्र आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Edited By – Priya Dixit 

 

Go to Source