रथोत्सव मिरवणुकीत भाविकांचा उत्साह द्विगुणीत
दुपारीच अचानक पावसाला सुऊवात : मात्र भाविकांच्या उत्साहात तसूभरही फरक नाही
वार्ताहर /सांबरा
सांबरा येथे श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेच्या तिसऱ्या दिवशीही हजारो भक्तांनी रथोत्सवात भाग घेतला. भंडाऱ्याची उधळण करत व श्री लक्ष्मीदेवीचा जयजयकार करत सुरू असलेल्या रथोत्सवामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी सकाळी शुक्रवार पेठ येथून रथोत्सवाला प्रारंभ झाला. दुपारी साडेबाराच्या सुमारास मंगळवार पेठमध्ये रथ आला असता अचानक पावसाला सुऊवात झाली. त्यामुळे काही वेळ मिरवणूक थांबविण्यात आली. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर दुपारी दोन वाजता मिरवणुकीला पुन्हा प्रारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक, माऊती गल्ली, लक्ष्मी गल्ली येथे रथ श्री महालक्ष्मी देवी यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई यांच्या घरापर्यंत आला. तेथून परत लक्ष्मी मंदिरजवळ आल्यानंतर गुऊवारची रथ मिरवणूक थांबविण्यात आली. पावसामुळे काही वेळ रथ मिरवणुकीला विलंब झाला, मात्र त्यामुळे भाविकांच्या उत्साहात तसूभरही फरक पडला नव्हता.
देवी गदगेवर आज विराजमान होणार
शुक्रवार दि. 17 रोजी देवीचा रथ लक्ष्मी गल्ली, माऊती गल्लीमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर श्री महालक्ष्मी देवी गदगेवर विराजमान होणार आहे.
सांबरा येथील आजचा आठवडी बाजार रद्द
सांबरा येथे शुक्रवार दि. 17 मे रोजी होणारा आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे. याची नोंद शेतकरी वर्ग, व्यापारी वर्ग, विक्रेते व नागरिकांनी घ्यावी, असे ग्रा. पं. अध्यक्षा रचना गावडे यांनी कळविले आहे. सांबरा येथे मंगळवार दि. 14 मे पासून श्री महालक्ष्मी देवीची यात्रा सुरू आहे. येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. सध्या सुरू असलेल्या यात्रेमुळे आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे.
Home महत्वाची बातमी रथोत्सव मिरवणुकीत भाविकांचा उत्साह द्विगुणीत
रथोत्सव मिरवणुकीत भाविकांचा उत्साह द्विगुणीत
दुपारीच अचानक पावसाला सुऊवात : मात्र भाविकांच्या उत्साहात तसूभरही फरक नाही वार्ताहर /सांबरा सांबरा येथे श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेच्या तिसऱ्या दिवशीही हजारो भक्तांनी रथोत्सवात भाग घेतला. भंडाऱ्याची उधळण करत व श्री लक्ष्मीदेवीचा जयजयकार करत सुरू असलेल्या रथोत्सवामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी सकाळी शुक्रवार पेठ येथून रथोत्सवाला प्रारंभ झाला. दुपारी साडेबाराच्या सुमारास मंगळवार […]