नदालला हरवून थॉमसन उपांत्य फेरीत

साबालेंका, अझारेंका, रिबाकिना शेवटच्या चार खेळाडूत वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या ब्रिस्बेन खुल्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनचा माजी टॉप सिडेड राफेल नदालचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत जॉर्डन थॉमसनने संपुष्टात आणले. महिलांच्या विभागात द्वितीय मानांकित साबालेंका, बेलारुसची माजी टॉप सिडेड अझारेंका तसेच इलिना रिबाकीना आणि लिंडा नोस्कोवाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. पुरूष एकेरीच्या खेळविण्यात […]

नदालला हरवून थॉमसन उपांत्य फेरीत

साबालेंका, अझारेंका, रिबाकिना शेवटच्या चार खेळाडूत
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
येथे सुरू असलेल्या ब्रिस्बेन खुल्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनचा माजी टॉप सिडेड राफेल नदालचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत जॉर्डन थॉमसनने संपुष्टात आणले. महिलांच्या विभागात द्वितीय मानांकित साबालेंका, बेलारुसची माजी टॉप सिडेड अझारेंका तसेच इलिना रिबाकीना आणि लिंडा नोस्कोवाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.
पुरूष एकेरीच्या खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जॉर्डन थॉमसनने स्पेनच्या राफेल नदालचा 6-7, 7-6 (8-6), 6-3 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. हा सामना जवळपास साडेतीन तास चालला होता. ऑस्ट्रेलियाच्या थॉमसनने या सामन्यात पहिला सेट गमविल्यानंतर टायब्रेकरमधील दुसरा सेट जिंकून नदालशी बरोबरी साधली. मात्र तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये नदालची दमछाक झाल्याचे जाणवले. थॉमसनच्या वेगवान आणि अचूक सर्व्हिससमोर नदालला परतीचे फटके मारता न आल्याने त्याला ही लढत गमवावी लागली. पुरूष एकेरीच्या अन्य एका सामन्यात होल्गेर रुनीने डकवर्थचा 6-2, 7-6 (8-6) असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. रोमन सैफुलीनने अर्नेल्डीवर 7-6 (7-4), 6-2 अशी मात करत उपांत्यफेरी गाठली आहे.
महिलांच्या विभागात साबालेंकाने डेरिया कॅसेटकिनाचा 6-1, 6-4 असा फडशा पाडत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. बेलारूसच्या अझारेंकाने ओस्टापेंकोचा 6-3, 3-6, 7-5 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. साबालेंका आणि अझारेंका यांच्यात उपांत्य लढत होईल. त्याचप्रमाणे रिबाकीना आणि नोस्कोवा यांनीही उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. रिबाकीनाने पोटापोव्हावर 6-1 अशी मात केली. दुखापतीमुळे पोटापोव्हाने हा सामना अर्धवट सोडला तर नोस्कोव्हाने मीरा अँड्रीव्हावर 7-5, 6-3 अशी मात करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले.