राज्यातील (maharashtra) 288 विधानसभा जागांसाठी (vidhan sabha elections) बुधवारी सरासरी 65 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. या निवडणुकीत मुंबईकरांच्या मतदानाचा टक्का 2019 च्या तुलनेत वाढल्याचे पाहायला मिळाले. मुंबई शहर (mumbai) आणि उपनगर परिसरात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अनुक्रमे 49.07 टक्के आणि 51.92 टक्के इतके मतदान नोंदवले गेले. यामध्ये कुलाबा (colaba) विधानसभा मतदारसंघात शहरातील सर्वात कमी 41.64 टक्के मतदान झाले आहे. तर बोरीवलीमध्ये (borivali) सर्वाधिक 60.50 टक्के मतदान झाले. त्यानंतर भांडुप (bhandup) पश्चिम विभाग दुसर्या क्रमांकावर राहिला. येथे 60.18 टक्के मतदान झाले.राज्यात झालेल्या सरासरी मतदानाच्या (voting) तुलनेत मुंबई शहर आणि उपनगरात झालेले मतदान कमी असले तरी 2019 च्या निवडणुकीपेक्षा यंदा झालेले मतदान किंचित जास्त आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई शहर आणि उपनगरीय जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे 48.22 आणि 51.28 टक्के मतदान झाले होते. जवळपास सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात 52.38 टक्के इतके मतदान झाले होते.निवडणूक आयोगाच्या (EC) अनेक प्रयत्नांनंतर देखील मुंबई शहर आणि उपनगर भागातील 36 विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का कमीच राहत आला आहे. 2019 विधानसभा निवडणुकीतही हाय प्रोफाईल कुलाबा मतदारसंघात 40.15 टक्के मतदान झाले होते. यावेळी मात्र येथे मतदानाची टक्केवारी काहीशी वाढली आहे.अनेक मोहिमा राबवून, तसेच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने अनेक प्रयत्न करूनही कुलाबा विधानसभा मतदारसंघात कमी मतदान झाले. लोकसभा निवडणुकीत देखील कुलाबा भागात 43.68 टक्के इतके कमी मतदान झाले होते. हेही वाचातारापूरमध्ये गोदामाला भीषण आगनवी मुंबई : अदानी कन्व्हेन्शन सेंटर उभारणार
मुंबईतील ‘या’ मतदारसंघात सर्वाधिक मतदान