राजारामपुरीत चोरट्यांचा धुमाकूळ, 6 दुकाने फोडली! रोख रकमेसह , 2 लाखांचा ऐवज लंपास

कोल्हापूर प्रतिनिधी राजारामपुरी परिसरात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास धुमाकूळ घातला. अज्ञात चोरट्यांनी पाच ते सहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न करत दोन ठिकाणाहून सुमारे साठ हजार रुपयांची रक्कम एक दुचाकी आणि डीव्हीआर असा सुमारे दोन लाखाचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत राजारामपुरी पोलिस ठाण्यात सुरु होते. याबाबत अधिक माहिती अशी की, […]

राजारामपुरीत चोरट्यांचा धुमाकूळ, 6 दुकाने फोडली! रोख रकमेसह , 2 लाखांचा ऐवज लंपास

कोल्हापूर प्रतिनिधी

राजारामपुरी परिसरात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास धुमाकूळ घातला. अज्ञात चोरट्यांनी पाच ते सहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न करत दोन ठिकाणाहून सुमारे साठ हजार रुपयांची रक्कम एक दुचाकी आणि डीव्हीआर असा सुमारे दोन लाखाचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत राजारामपुरी पोलिस ठाण्यात सुरु होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजारामपुरी येथील ताराराणी विद्यापीठाच्या पिछाडीस कोमल कोकरे यांचे मायरा ब्युटी पार्लर नावाचे दुकान आहे. अज्ञातानी बुधवारी मध्यरात्री या दुकानाचे शटर उचकटण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झालाय. त्यानंतर शेजारी असणाऱ्या सुनील मोरे यांच्या गंधार ऑप्टीशियन नावाच्या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञातांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील ड्रॉवरमध्ये असणारी 35 हजार रुपयाची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. यानंतर शेजारी विनायक कुलकर्णी यांच्या आनंद मेडिकल स्टोअर्सचे शटर उचकटण्याचा देखील प्रयत्न केला मात्र त्यात अयशस्वी झालेत. यानंतर चोरट्यानी या परिसरातील मंगेश सावंत यांच्या फॅमिली बझार या किराणा दुकानाचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील 20 हजार रुपयांची रोकड, डीव्हीआर आणि सीपीयू लंपास केला.चोरटयांनी या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे विरुद्ध दिशेने फिरवून ठेवले होते.यानंतर सुरज कोपार्डे यांच्या दारात लावलेली साठ हजार रुपये किमतीची फॅशन प्रो गाडी लॉक तोडून चोरून नेली.
चोरट्यांचा धुमाकूळ
बुधवारी रात्री चोरट्यानी राजारामपुरीतील एकाच परिसरातील पाच ते सहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सुनील मोरे मंगेश सामंत आणि सुरज कोपार्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात विरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.