पिरनवाडी येथे भरदिवसा घर फोडले
सिद्धेश्वर गल्लीत चोरी : सोन्याचे दागिने लांबविले
वार्ताहर /किणये
सिद्धेश्वर गल्ली, पिरनवाडी येथे दिवसाढवळ्या घर फोडून चोरट्यांनी घरातील अंगठी, गंठण आदी सोन्याचे दागिने लांबविले आहे. सदर चोरीचा प्रकार मंगळवार दि. 18 रोजी दुपारी चारच्या दरम्यान उघडकीस आला. तर ही चोरी दुपारी एक ते तीनच्या दरम्यान झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.दिवसा घर फोडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिद्धेश्वर गल्ली, पिरनवाडी अष्टविनायकनगर, पाचवा क्रॉस येथील नारायण वेताळ पाटील यांच्या राहत्या घरात ही चोरी झाली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी दिलेली माहिती अशी की, नारायण पाटील व त्यांच्या कुटुंबातील सदस्य सर्वजण कामाला जातात. रोजच्याप्रमाणे सर्वजण मंगळवारीही कामावर गेले होते. नारायण पाटील हे लेथ मशीनवर कामाला जातात.
ते मंगळवारी दुपारी चार वाजता घरी आले असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी घराचा समोरचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. पाटील यांनी आपल्या घरासमोर काही दिवसांपूर्वीच विहीर खोदली आहे. त्यांनी कुदळ जिन्यासमोरच ठेवली होती. त्याच कुदळीने चोरट्याने समोरचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. कपडे व इतर सर्व साहित्य विस्कटले होते. तसेच घरातील कपाट तोडून त्यातील अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी, लहान बाळाचे वाळे व इतर दागिने, तसेच दोन तोळ्याचे गंठण लांबविले आहे. वडगाव ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घराची पाहणी केली. श्वानपथकाद्वारे पाहणी केली असता पाठीमागील दरवाजाच्या पुढे जाऊन श्वान गुरफटले. सिद्धेश्वर गल्ली परिसरात दिवसाढवळ्या चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Home महत्वाची बातमी पिरनवाडी येथे भरदिवसा घर फोडले
पिरनवाडी येथे भरदिवसा घर फोडले
सिद्धेश्वर गल्लीत चोरी : सोन्याचे दागिने लांबविले वार्ताहर /किणये सिद्धेश्वर गल्ली, पिरनवाडी येथे दिवसाढवळ्या घर फोडून चोरट्यांनी घरातील अंगठी, गंठण आदी सोन्याचे दागिने लांबविले आहे. सदर चोरीचा प्रकार मंगळवार दि. 18 रोजी दुपारी चारच्या दरम्यान उघडकीस आला. तर ही चोरी दुपारी एक ते तीनच्या दरम्यान झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.दिवसा घर फोडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण […]