डेक्कन क्वीनसह मुंबई- पुणे मार्गावरील 5 एक्सप्रेस रद्द
मुंबई- पुणे मार्गावर रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. कर्जत यार्ड पुनर्डभारणी आणि आधुनिक सिग्नलिंग प्रणालीच्या नॉन-इंटरलॉकिंग कामांसाठी मध्य रेल्वेने पळसदरी ते भिवपुरी विभागात १९ तासांचा ब्लॉक जाहीर केला आहे.हा ब्लॉक शनिवारी दुपारी 12.20 ते रविवारी पहाटे 7.20 पर्यंत लागू राहणार असल्याने पुणे-मुंबई मार्गावर प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक प्रमुख एक्स्प्रेस गाड्या रद्द होणार असून, इतर काही गाड्या पुणेपर्यंतच मर्यादित राहणार आहेत. 19 तासांचा मेगाब्लॉकतसेच, पर्यायी मार्गाने वळवल्या जाणाऱ्या गाड्यांमुळे प्रवास वेळेत उशीर होण्याची शक्यता आहे. याशिवाय, उद्या (शनिवार) पाच लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.मध्य रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जत यार्डाचे पुनर्डभारण आणि सिग्नलिंग प्रणालीचे आधुनिकीकरण हे रेल्वे वाहतुकीला अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम बनवण्यासाठी आवश्यक आहे. या कामांमुळे पळसदरी ते भिवपुरी या विभागातील ट्रॅक आणि सिग्नलिंग सिस्टीम पूर्णपणे बंद राहणार आहे. हा ब्लॉक एकूण 19 तासांचा असून, तो शनिवारी दुपारी 12.20 वाजता सुरू होईल आणि रविवारी सकाळी 7.20 पर्यंत चालू राहील. या कालावधीत या विभागात कोणत्याही गाडीचा प्रवास शक्य नसल्याने रेल्वेने प्रवाशांसाठी पूर्वसूचना जारी केली आहे. रद्द होणाऱ्या प्रमुख एक्स्प्रेस गाड्याया ब्लॉकचा सर्वाधिक परिणाम पुणे-मुंबई मार्गावरील एक्स्प्रेस गाड्यांवर होणार आहे. या एक्सप्रेस होणार रद्द१२१२५/१२१२६ सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस: ही दैनिक एक्स्प्रेस पुणे-मुंबई प्रवाशांसाठी लोकप्रिय असली, तरी ब्लॉकमुळे ती रद्द होणार आहे.१२१२३/१२१२४ डेक्कन क्वीन एक्स्प्रेस: मुंबई-पुणे मार्गावरील ही वेगवान गाडी रद्द होण्यामुळे व्यावसायिक प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.११००८ पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस: पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या या गाडीचा प्रवास रद्द.१२१२८ पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस: दैनिक प्रवाशांसाठी महत्त्वाची ही गाडीही रद्द.२२१०६ पुणे-सीएसएमटी इंद्रायणी एक्स्प्रेस: पुणे-सिंधुदुर्ग मार्गावरील ही गाडी मुंबईपर्यंत रद्द राहणार.या व्यतिरिक्त, ११०३० कोल्हापूर-सीएसएमटी कोयना एक्स्प्रेस आणि ११३०२ बेंगळुरू-सीएसएमटी एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या पुणे स्थानकापर्यंतच चालवल्या जाणार आहेत.पुणे ते मुंबई विभाग हा त्यांच्यासाठी पूर्णपणे रद्द असल्याने प्रवाशांना इथून पुढे पर्यायी वाहनांचा आधार घ्यावा लागेल.हेही वाचाHi पाठवा आणि मेट्रोची तिकीट बुक करा
अॅक्वा लाईनच्या नवीन टप्प्यात इंटरनेटच नाही
Home महत्वाची बातमी डेक्कन क्वीनसह मुंबई- पुणे मार्गावरील 5 एक्सप्रेस रद्द
डेक्कन क्वीनसह मुंबई- पुणे मार्गावरील 5 एक्सप्रेस रद्द
मुंबई- पुणे मार्गावर रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. कर्जत यार्ड पुनर्डभारणी आणि आधुनिक सिग्नलिंग प्रणालीच्या नॉन-इंटरलॉकिंग कामांसाठी मध्य रेल्वेने पळसदरी ते भिवपुरी विभागात १९ तासांचा ब्लॉक जाहीर केला आहे.
हा ब्लॉक शनिवारी दुपारी 12.20 ते रविवारी पहाटे 7.20 पर्यंत लागू राहणार असल्याने पुणे-मुंबई मार्गावर प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक प्रमुख एक्स्प्रेस गाड्या रद्द होणार असून, इतर काही गाड्या पुणेपर्यंतच मर्यादित राहणार आहेत.
19 तासांचा मेगाब्लॉक
तसेच, पर्यायी मार्गाने वळवल्या जाणाऱ्या गाड्यांमुळे प्रवास वेळेत उशीर होण्याची शक्यता आहे. याशिवाय, उद्या (शनिवार) पाच लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जत यार्डाचे पुनर्डभारण आणि सिग्नलिंग प्रणालीचे आधुनिकीकरण हे रेल्वे वाहतुकीला अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम बनवण्यासाठी आवश्यक आहे. या कामांमुळे पळसदरी ते भिवपुरी या विभागातील ट्रॅक आणि सिग्नलिंग सिस्टीम पूर्णपणे बंद राहणार आहे.
हा ब्लॉक एकूण 19 तासांचा असून, तो शनिवारी दुपारी 12.20 वाजता सुरू होईल आणि रविवारी सकाळी 7.20 पर्यंत चालू राहील. या कालावधीत या विभागात कोणत्याही गाडीचा प्रवास शक्य नसल्याने रेल्वेने प्रवाशांसाठी पूर्वसूचना जारी केली आहे. रद्द होणाऱ्या प्रमुख एक्स्प्रेस गाड्याया ब्लॉकचा सर्वाधिक परिणाम पुणे-मुंबई मार्गावरील एक्स्प्रेस गाड्यांवर होणार आहे.
या एक्सप्रेस होणार रद्द१२१२५/१२१२६ सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस: ही दैनिक एक्स्प्रेस पुणे-मुंबई प्रवाशांसाठी लोकप्रिय असली, तरी ब्लॉकमुळे ती रद्द होणार आहे.
१२१२३/१२१२४ डेक्कन क्वीन एक्स्प्रेस: मुंबई-पुणे मार्गावरील ही वेगवान गाडी रद्द होण्यामुळे व्यावसायिक प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.
११००८ पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस: पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या या गाडीचा प्रवास रद्द.
१२१२८ पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस: दैनिक प्रवाशांसाठी महत्त्वाची ही गाडीही रद्द.
२२१०६ पुणे-सीएसएमटी इंद्रायणी एक्स्प्रेस: पुणे-सिंधुदुर्ग मार्गावरील ही गाडी मुंबईपर्यंत रद्द राहणार.या व्यतिरिक्त, ११०३० कोल्हापूर-सीएसएमटी कोयना एक्स्प्रेस आणि ११३०२ बेंगळुरू-सीएसएमटी एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या पुणे स्थानकापर्यंतच चालवल्या जाणार आहेत.
पुणे ते मुंबई विभाग हा त्यांच्यासाठी पूर्णपणे रद्द असल्याने प्रवाशांना इथून पुढे पर्यायी वाहनांचा आधार घ्यावा लागेल.हेही वाचा
Hi पाठवा आणि मेट्रोची तिकीट बुक कराअॅक्वा लाईनच्या नवीन टप्प्यात इंटरनेटच नाही