महाराष्ट्र निवडणुका पूर्वी हे नेते भाजपचा साथ सोडणार! राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षात प्रवेश करणार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पुढच्या महिन्यावर येऊन ठेपल्या आहे. अद्याप जागावाटप झालेला नाही. विधानसभा निवडणुकापूर्वी भाजपला मोठा धक्का बसू शकतो. पुण्यातील इंदापूर मतदार संघातील भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करण्याच्या बातम्या येत आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतलं दोघांमध्ये सुमारे तास भर चर्चा झाली. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे भाजपचा पक्ष सोडणार हे निश्चित झाले आहे.
या पूर्वी समरजित सिंह घाटगे यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला तसेच सोलापूरचे मोहिते पाटील यांनी देखील लोकसभेत भाजपला सोडचिट्ठी दिली. आता हर्षवर्धन पाटील हे भाजप पक्षाला राम राम ठोकणार असून हा भाजपसाठी मोठा धक्का आहे.
Edited by – Priya Dixit