ठाकरे गट शिवसेने प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी दिल्या या सूचना

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुखांची बैठक आज सेना भवनात झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या सर्व 288 जागांचा आढावा घेतला आणि येत्या 7 दिवसांच्या आत शिवसेनेच्या ठाकरे गटातील प्रत्येक संपर्क प्रमुखाला त्यांच्या विधानसभा मतदारसंघाचा तपशीलवार …

ठाकरे गट शिवसेने प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी दिल्या या सूचना

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुखांची बैठक आज सेना भवनात झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या सर्व 288 जागांचा आढावा घेतला आणि येत्या 7 दिवसांच्या आत शिवसेनेच्या ठाकरे गटातील प्रत्येक संपर्क प्रमुखाला त्यांच्या विधानसभा मतदारसंघाचा तपशीलवार अहवाल पक्ष मुख्यालयात सादर करण्याचा सूचना देण्यात आल्या.

तसेच या अहवालात प्रत्येक संपर्क प्रमुखाला त्यांच्या विधानसभा मतदार संघात पक्षाची ताकद आणि सन्घटनात्मक बांधणीची स्थितीचा अहवाल सादर करावा लागणार आहे. 

सभेत उद्धव ठाकरेंनी 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या

-आगामी विधानसभा निवडणूक आपण महाविकास आघाडी आघाडी म्हणून लढवणार असलो तरी आपण सर्वांनी 288 जागांसाठी तयारीला लागा. सर्व 288 जागांवर संघटनेची ताकद वाढवा.

 

-महाविकास आघाडीत ज्या जागांवर शिवसेना ठाकरे गटाची ताकद आहे त्या जागांवर फक्त शिवसेना ठाकरे गट लढणार.असे सांगितले. 

 

Edited By – Priya Dixit 

Go to Source