Parenting Tips:पालकांच्या या चांगल्या सवयींमुळे मुलांना चांगली सवय लागते

Parenting Tips:आपल्या मुलांनी चांगले वागावे शिस्तबद्ध राहावे ऐसे सर्व पालकांना वाटत असते. मात्रा मुलांना चांगल्या सवयी लावणे हे पालकांच्या हातात असते. पालकांच्या चांगल्या आणि वाइट सवयींचा मुलांवर सखोल परिणाम होतो. कारण मोठ्यांचे अनुसरण मुले करतात.

Parenting Tips:पालकांच्या या चांगल्या सवयींमुळे मुलांना चांगली सवय लागते

Parenting Tips:आपल्या मुलांनी चांगले वागावे शिस्तबद्ध राहावे ऐसे सर्व पालकांना वाटत असते. मात्रा मुलांना चांगल्या सवयी लावणे हे पालकांच्या हातात असते. पालकांच्या चांगल्या आणि वाइट सवयींचा मुलांवर सखोल परिणाम होतो. कारण मोठ्यांचे अनुसरण मुले करतात. या साठी पालकांना देखील शिस्तबद्ध राहणे माहत्त्वाचे आहे. मुलांना चांगल्या सवयी शिकवण्यासाठी पालकांनी या गोष्ठी लक्षात ठेवाव्यात.चला तर मग जाणून घेऊ या.

 

नियमांचे पालन करणे –

जीवनात नियम असणे गरजेचे आहे. नियम मुलांना एका चौकटीत राहायला आणि त्याचे परिणाम समजून घेण्यात मदत करते. आपण नियमाने वागल्यावर मुले देखील नियमाने वागतात. यशस्वी होण्यासाठी नियमबद्ध असणे किती महत्त्वाचे आहे हे मुलांना समजावून सांगावे. 

 

संयम राखणे-

पालकांनी मुलाला शिकवताना किंवा सुधारताना संयमाचा अवलंब करावा. त्यांचे शांत वर्तन मुलाला धीर धरायला शिकवेल. संयमाने शिस्त शिकवणारे पालक मुलांना सुरक्षित वाटतात.संयमी पालकांना मुलांना शिक़वायला वेळ लागत नाही. ते लवकर शिकतात.

 

वेळेचे महत्त्व समजवणे –

प्रत्येक पालकाने वेळेचे बंधन ठेवणे  महत्त्वाचे आहे.  ठराविक दिनचर्या, विशेषत: खाणे, पिणे, खेळणे आणि झोपणे यासाठी ठराविक वेळा पाळल्यास मुलांना वेळेचे महत्त्व समजेल.

 

मुलांना जबाबदारीची जाणीव करून  द्या-

मुलांना त्यांच्या वयानुसार त्यांच्यावर कामाची जबाबदारी टाका. त्यांची खेळणी आवरून  ठेवणे. तसेच घरातील लहान कामे त्यांच्यावर टाका. जेने करून ते स्वताची जबाबदारी समजतील. मुलाच्या दैनंदिन जीवनात जबाबदारी आणण्याचा प्रयत्न केल्यास मूल शिस्तप्रिय आणि स्वावलंबी होईल.

 

स्तुती आणि बक्षिसे द्या

मुलांनी चांगले काम केल्यावर त्यांची स्तुति करा किवा त्यांना बक्षीस द्यावे. असे केल्याने त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि ते आणखीनच चांगले काम करतील. त्यांना चांगले अणि नीटनेटके काम करण्याची सवय लागेल.  

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By – Priya Dixit