सीएसएमटी स्थानकातील फलाटाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळं कोकण रेल्वेच्या मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरू एक्सप्रेस या तीन गाड्यांचा प्रवास 28 फेब्रुवारीपर्यंत ठाणे आणि दादरपर्यंतच धावणार आहे. विस्तारीकरणाचे काम शिल्लक असल्याने हा कालावधी वाढला आहे. सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 12 आणि 13 च्या विस्तारीकरणाबरोबरच पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळं याचा फटका मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरू एक्स्प्रेस या गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे. त्यामुळं प्रवाशांची ओढाताण व हैराणी होण्याची शक्यता आहे. जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरू एक्स्प्रेस या गाड्यांचे सीएसएमटीऐवजी ठाणे आणि दादर स्थानकापर्यंत धावत आहेत. सुरुवातीला हा कालावधी 31 जानेवारीपर्यंत होता मात्र आता हा कालावधी वाढवून 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवला आहे. तस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कोकण रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मंगळुरू ते मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस (12134) या गाडीचा प्रवास ठाणे स्थानकावर संपणार आहे. मडगाव जंक्शन-सीएसएमटी तेजस (22120) आणि मडगाव जंक्शन-सीएसएमटी जनशताब्दी (12052) गाड्या 28 फेब्रुवारीपर्यंत दादर स्थानकापर्यंत धावणार आहेत. हेही वाचामे महिन्यापर्यंत कोस्टल रोडवर नवीन बस धावणार
लोकल ट्रेनच्या वेळेमधील अंतर 2 मिनिटांनी कमी होणार
कोकणातून येणाऱ्या ‘या’ एक्स्प्रेस ठाणे-दादरपर्यंतच धावणार