Maharashtra Tourism : कोकण म्हणजे केवळ गणपतीपुळे किंवा अलिबाग नाही. कोकणच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर अशी काही ठिकाणे दडलेली आहे, जिथे अजूनही पर्यटकांची फारशी गर्दी नसते. जर तुम्हाला गोंगाटापासून दूर, निवांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा हवा असेल, तर ही ५ ‘हिडन जेम्स’ तुमच्यासाठी आहे.
ALSO READ: The Italy of India महाराष्ट्रातील या हिल स्टेशनला भारताचे इटली म्हटले जाते
भोगवे समुद्रकिनारा सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग मधील भोगवे समुद्रकिनारा हा किनारा अतिशय नयनरम्य आहे. इथे कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा संगम होतो. पांढरी शुभ्र वाळू आणि निळेभोर पाणी. इथून जवळच असलेल्या डोंगरावरून तुम्ही ‘बॅकवॉटर’ आणि समुद्राचा संगम पाहू शकता.
निवती समुद्रकिनारा सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग मधील निवती समुद्रकिनारा एका डोंगराच्या मागे लपलेला असल्याने इथे पर्यटक खूप कमी असतात. हे ठिकाण एखाद्या परदेशी बीचसारखे वाटते. इथे समुद्राच्या लाटांमुळे नैसर्गिक खडक तयार झाले आहे. ‘निवती किल्ला’ सुद्धा जवळच असून तिथून समुद्राचे विहंगम दृश्य दिसते.
गणेशगुळे समुद्रकिनारा रत्नागिरी
गणेशगुळे समुद्रकिनारा हा रत्नागिरी शहरापासून जवळ असूनही हा किनारा अजूनही पर्यटकांच्या नजरेपासून दूर आहे. दोन डोंगरांच्या मध्ये वसलेला हा किनारा अतिशय शांत आहे. इथे समुद्र किनाऱ्यालगत मोठी नारळ-पोफळीची बाग आहे.
आडे-उत्तमंबर समुद्रकिनारा रत्नागिरी
दापोली जवळ असलेला हा आडे-उत्तमंबर समुद्रकिनारा म्हणजे निसर्गाची एक सुंदर कलाकृती आहे. इथल्या टेकडीवर असलेले ‘भार्गवराम मंदिर’ आणि तिथून दिसणारा अथांग समुद्र मनाला शांती देतो. हा भाग अजूनही पूर्णपणे व्यावसायिक झालेला नाही.
कोंडिवली समुद्रकिनारा रायगड
कोंडिवली समुद्रकिनारा हा श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरच्या जवळ असूनही, लोक या किनाऱ्याला विसरतात.रायगडमध्ये असलेला हा किनारा लांबवर पसरलेला आहे आणि इथे समुद्राचे पाणी तुलनेने शांत असते. वॉटर स्पोर्ट्सपेक्षा ‘सोलो ट्रॅव्हलिंग’ किंवा शांत संध्याकाळसाठी हे उत्तम ठिकाण आहे.
ALSO READ: Kasheli Beach कोकणातील ऑफबीट व्हिलेज टुरिझम: कशेळी गाव
