मुंबई-पुण्याजवळच्या ‘या’ ५ जागा, जिथे तुम्ही एका दिवसात पिकनिक करून परत येऊ शकता

Maharashtra Tourism : महाराष्ट्रात अनेक पर्यटनस्थळे आहे. दरवर्षी अनेक पर्यटक महाराष्ट्राला भेट देत असतात. तसेच अनेक जण धकाधकीच्या जीवनातून आराम मिळण्यासाठी पर्यटन करतात. व मुंबई आणि पुणेकरांच्या धकाधकीच्या आयुष्यात विकेंडला थोडी ‘शांतता’ …
मुंबई-पुण्याजवळच्या ‘या’ ५ जागा, जिथे तुम्ही एका दिवसात पिकनिक करून परत येऊ शकता

Maharashtra Tourism : महाराष्ट्रात अनेक पर्यटनस्थळे आहे. दरवर्षी अनेक पर्यटक महाराष्ट्राला भेट देत असतात. तसेच अनेक जण धकाधकीच्या जीवनातून आराम मिळण्यासाठी पर्यटन करतात. व  मुंबई आणि पुणेकरांच्या धकाधकीच्या आयुष्यात विकेंडला थोडी ‘शांतता’ मिळवण्यासाठी लांबच्या सहलीला जाण्यापेक्षा एक दिवसाची पिकनिक हा कधीही चांगला पर्याय असतो. आज आपण अशा ५ ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत जिथे तुम्ही सकाळ-संध्याकाळ प्रवास करून आरामात परत येऊ शकता. 

ALSO READ: Tourist Cities in Maharashtra : महाराष्ट्रातील मोठी शहरे आणि त्यांची मुख्य आकर्षणे

१. लोणावळा आणि खंडाळा  

लोणावळा आणि खंडाळा हे मुंबई-पुणेकरांसाठी हे सर्वात ‘फेव्हरेट’ आणि जवळचे ठिकाण आहे. येथे तुम्ही टायगर पॉईंट, भुशी डॅम, राजमाची पॉईंट पाहू शकतात आणि लोणावळ्याची प्रसिद्ध चिक्कीचा आस्वाद घेऊ शकतात.

अंतर: मुंबईपासून ८० किमी, पुण्यापासून ६५ किमी.

 

२. माथेरान  

माथेरान  हे वाहनांना बंदी असलेले हे आशियातील एकमेव ‘प्रदूषणमुक्त’ हिल स्टेशन आहे. येथे तुम्ही पॅनोरमा पॉईंट, इको पॉईंट आणि टॉय ट्रेनची सफर अनुभवू शकतात. इथली शांतता आणि लाल मातीचे रस्ते तुम्हाला शहराच्या गोंगाटापासून दूर नेतात.

अंतर: मुंबईपासून ८५ किमी, पुण्यापासून १२० किमी.

 

३. अलिबाग  

जर तुम्हाला समुद्राची आवड असेल, तर अलिबाग हा सर्वोत्तम पर्याय आहे. येथील वरसोली बीच, अलिबाग बीच आणि कुलाबा किल्ला पाहण्यासारखा आहे. मुंबईकरांसाठी ‘रो-रो फेरी’ मुळे गाड्यांसह प्रवास करणे अत्यंत सोपे झाले आहे.

अंतर: मुंबईपासून (फेरीने) १ तास, पुण्यापासून १४५ किमी.

 

४. मुळशी धरण  

निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर मुळशीला नक्की भेट द्या. येथे ताम्हिणी घाट, धरणाचा विस्तीर्ण परिसर आणि घनदाट झाडी एक विलक्षण अनुभव देते. फोटोग्राफी आणि फॅमिली पिकनिकसाठी हे अतिशय शांत ठिकाण आहे.

अंतर: पुण्यापासून ४५ किमी, मुंबईपासून १६० किमी.

 

५. लोहगड किल्ला  

इतिहास आणि ट्रेकिंगची आवड असलेल्यांसाठी लोहगड हा उत्तम पर्याय आहे. येथे ‘विंचू काटा’ बुरुज, भाजे लेणी आणि पवना धरणाचा परिसर पाहण्यासारखा आहे.

चढायला सोपा असल्यामुळे लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच इथे येऊ शकतात.

अंतर: पुण्यापासून ६० किमी, मुंबईपासून १०० किमी.

ALSO READ: Pawna Lake लोणावळ्याजवळील अतिशय सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ