संसदेत आज उमटणार ‘नीट’ पेपरफुटीचे पडसाद

संसदेत आज उमटणार ‘नीट’ पेपरफुटीचे पडसाद

विरोधकांची जोरदार मोर्चेबांधणी : सरकारकडूनही सज्जता : खर्गे यांच्या निवासस्थानी ‘इंडिया’च्या नेत्यांची खलबते,पंतप्रधानांच्या निवासात मंत्रीमहोदयांची बैठक संपन्न,शिक्षणमंत्री सभागृहात निवेदन देतील अशी शक्यता
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
संसद अधिवेशनादरम्यान राष्ट्रपतींचे अभिभाषण झाल्यानंतर आता शुक्रवारपासून दोन्ही सभागृहात त्यावर चर्चा आयोजित करण्यात येणार आहे. या चर्चेला सुरुवात होत असतानाच विरोधकांकडून ‘नीट’ पेपरपुटीबाबत आवाज उठविला जाण्याची शक्यता आहे. संसदेबाहेरही या मुद्द्यावर विरोधी पक्षाचे नेते आंदोलन छेडणार आहेत. गुरुवारी सायंकाळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत यासंबंधी चर्चा करण्यात आली. तसेच सरकारच्यावतीनेही पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी संसद अधिवेशन काळातील पुढील रणनीतीबाबत बैठक झाली. या बैठकीत राजनाथ सिंग यांच्यासह काही निवडक मंत्री उपस्थित होते.
‘नीट’ पेपर लीकच्या मुद्यावरून विरोधक पूर्णपणे एकवटले आहेत. ‘नीट’ पेपर पेपरफुटीसंदर्भात आपल्या प्रश्नांची उत्तरे संसदेत न मिळाल्यास सभागृहात निदर्शने केली जातील, असे इंडिया अलायन्समध्ये समाविष्ट असलेल्या विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. तसेच या मुद्यावर तातडीने संसदेत चर्चा सुरू करण्यासाठी शुक्रवारी सकाळी राज्यसभा आणि लोकसभेत नोटीस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘नीट’ पेपर फुटीप्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून विरोधक सरकारवर हल्लाबोल करत आहेत. विरोधकांनी यामध्ये हेराफेरीचा आरोप केला आहे. सरकारच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये प्रत्येकवेळी घोळ घातला जात असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. आता या प्रश्नावर संसद अधिवेशनात पडसाद उमटल्यास केंद्र सरकार ‘नीट’सह सर्व मुद्यांवर संसदेत उत्तर देण्यास तयार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षांनी ‘नीट’चा मुद्दा उपस्थित झाल्यास शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हस्तक्षेप करून प्रश्नांची उत्तरे देतील.
काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत परीक्षांमधील गोंधळाबाबत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी ‘नीट’ घोटाळ्याबाबत सरकारने कोणतीही लपवाछपवी करू नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. गेल्या पाच वर्षांत ‘एनटीए’ने घेतलेल्या 66 भरती परीक्षांपैकी किमान 12 पेपर लीक झाल्यामुळे 75 लाखांहून अधिक तऊण प्रभावित झाले आहेत. केवळ ‘पक्षीय राजकारणाच्या वर जावे’ असे सांगून मोदी सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही. देशातील तऊण न्यायाची मागणी करत असून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. केवळ बोलून प्रश्न सुटू शकत नाहीत, त्यासाठी निर्णायक पावले उचलावी लागतील, असे खर्गे म्हणाले.
राष्ट्रपतींकडून सरकारच्या वचनबद्धतेचा पुनऊच्चार
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुऊवारी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना पेपर फुटीप्रकरणी दोषींना शिक्षा करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनऊच्चार केला होता. यासाठी आगामी सर्वसाधारण अर्थसंकल्पात अनेक ऐतिहासिक पावले उचलली जातील आणि मोठे आर्थिक निर्णय घेतले जातील, असे राष्ट्रपतींनी सांगितले. देशातील तऊणांना मोठी स्वप्ने पाहता येतील आणि ती प्रत्यक्षात आणता येतील असे वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचा दावा राष्ट्रपतींनी केला आहे.a