राज्यात मध्यावधी निवडणुका होतील!

विरोधी पक्षनेते आर. अशोक यांचे भाकीत बेंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आपली खुर्ची सोडणार नाहीत आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार गप्प बसणार नाहीत. या दोघांमधील संघर्षामुळे काँग्रेसचे सरकार कोसळेल. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असे भाकीत विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केले आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्या तर भाजप आणि निजद एकत्र निवडणुका लढवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. रविवारी चामराजनगर […]

राज्यात मध्यावधी निवडणुका होतील!

विरोधी पक्षनेते आर. अशोक यांचे भाकीत
बेंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आपली खुर्ची सोडणार नाहीत आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार गप्प बसणार नाहीत. या दोघांमधील संघर्षामुळे काँग्रेसचे सरकार कोसळेल. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असे भाकीत विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केले आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्या तर भाजप आणि निजद एकत्र निवडणुका लढवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रविवारी चामराजनगर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, बिहार निवडणुकीनंतर राहुल गांधी डमी नेते बनले आहेत. आता यापुढे राज्यात काहीही झाले तरी मुख्यमंत्री सिद्धरामय्याच आपले वर्चस्व गाजवतील. बिहार निवडणुकीत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे अस्त्र काम केलेले नाही. शिवकुमार यांनी शिव आणि विष्णू पाहिले होते. आता फक्त ब्रह्माला पाहणे बाकी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
बिहार निवडणुकीचे निकाल सर्व उलटे लागले आहेत. काँग्रेस सरकार फक्त कर्नाटकातच मजबूत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणखी मजबूत झाले आहेत. सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपद सोडणार नाहीत आणि डी. के. शिवकुमार गप्प बसणार नाहीत. दोघांमधील संघर्षात राज्यातील काँग्रेस सरकार निश्चितच कोसळेल, असेही आर. अशोक यांनी स्पष्ट केले.