रेल्वे टर्मिनससाठी आता २६ जानेवारीला आंदोलन होणारच !

सावंतवाडी । प्रतिनिधी पत्रकार परिषदेत ॲड संदीप निंबाळकर , मिहीर मठकर भुमिकेवर ठाम मंजूर झालेले सावंतवाडी रेल्वे टर्मिनस जलद गतीने पूर्ण व्हावे आणि प्रा. मधू दंडवते यांचे नाव टर्मिनसला देण्यात यावे. जोपर्यंत रेल्वे टर्मिनसची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असू असे मत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ॲड संदीप निंबाळकर यांनी […]

रेल्वे टर्मिनससाठी आता २६ जानेवारीला आंदोलन होणारच !

सावंतवाडी । प्रतिनिधी
पत्रकार परिषदेत ॲड संदीप निंबाळकर , मिहीर मठकर भुमिकेवर ठाम
मंजूर झालेले सावंतवाडी रेल्वे टर्मिनस जलद गतीने पूर्ण व्हावे आणि प्रा. मधू दंडवते यांचे नाव टर्मिनसला देण्यात यावे. जोपर्यंत रेल्वे टर्मिनसची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असू असे मत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ॲड संदीप निंबाळकर यांनी आज सावंतवाडीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले रेल्वे टर्मिनसवर महत्त्वाच्या रेल्वेना थांबा देण्यात यावा ही मागणी आम्ही गेली कित्येक दिवसापासून करत आहोत. आता हे आमची मागणे पूर्ण व्हावी .नाहीतर सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना व्यापक असे प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीला आंदोलन करेल असेही त्यांनी म्हटले . आम्ही आमच्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहोत. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेले राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली आहे. आणि चर्चा केली आहे. असे आम्हाला स्पष्ट केले आहे. मात्र हे त्यांचे फक्त पोकळ आश्वासन आहे . आतापर्यंत त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर सावंतवाडी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे भूमिपूजन करून या मुद्द्यावर त्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकलीही. तसाच प्रकार हा रेल्वे टर्मिनस बाबत आहे. श्री केसरकर हे फसवे आश्वासन देत आहेत. 26 जानेवारीला आंदोलन करून हा प्रश्न तडीस लावणारच अशी भूमिका संदीप निंबाळकर व सचिव मिहीर मठकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत मांडली . आंदोलनात 25 संघटना सहभागी होणार आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बबन साळगावकर ,उमेश कोरगावकर ,विलास जाधव ,सुरेश भोगटे, रमेश बोंद्रे, पुंडलिक दळवी ,सायली दुभाषी ,सिद्धेश सावंत, भूषण बांदिवडेकर, जॉनी डिसोझा आदी उपस्थित होते. स्थित होते.