पूजा शर्माला दिलासा नाहीच

पुढील सुनावणी आता सोमवारी : पूजा शरण येण्याची शक्मयता पणजी : आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबियांचे घर पाडण्याच्या प्रकरणातील मुख्य  संशयित आरोपी पूजा शर्मा हिचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयातही तिला अपयश आले आहे. पूजा शर्मा हिला अंतरिम दिलासा देण्यास काल शुक्रवारी उच्च न्यायालयाने नकार  देताना  पुढील सुनावणी सुनावणी आता सोमवार 15 जुलै रोजी ठेवली आहे. पणजी प्रधान जिल्हा […]

पूजा शर्माला दिलासा नाहीच

पुढील सुनावणी आता सोमवारी : पूजा शरण येण्याची शक्मयता
पणजी : आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबियांचे घर पाडण्याच्या प्रकरणातील मुख्य  संशयित आरोपी पूजा शर्मा हिचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयातही तिला अपयश आले आहे. पूजा शर्मा हिला अंतरिम दिलासा देण्यास काल शुक्रवारी उच्च न्यायालयाने नकार  देताना  पुढील सुनावणी सुनावणी आता सोमवार 15 जुलै रोजी ठेवली आहे.
पणजी प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्या. इर्शाद आगा यांनी 10 जुलै रोजी पूजा शर्माचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तिला पोलिसांपुढे शरणागती पत्करणे, अथवा उच्च न्यायालयात दाद मागणे, हे दोनच पर्याय होते. शर्मा हिने दुसरा मार्ग पत्करताना उच्च न्यायालयात धाव घेतली. तिचे वकील अॅड. सुरेंद्र देसाई यांनी उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी घेण्यासाठी अर्ज केला. त्यावर काल शुक्रवारी दुपारी 2.30 वा. सुनावणी घेतली आणि क्राईम ब्रांचलाही हजर राहण्याची नोटीस पाठवली.
यावेळी अॅड. देसाई यांनी पूजा शर्माला पुढील सुनावणीपर्यंत अटक करण्यात येऊ नये, अशी विनंती केली. तोपर्यंत अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करून अंतरिम दिलासा द्यावा, अशी मागणी केली. या मागणीला सरकारी वकिलाने तीव्र विरोध केला. त्यामुळे ही सुनावणी पुढे सोमवारी चालू ठेवण्याचा आदेश देताना अंतरिम दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे न्या. वाल्मिकी मिनेझिस आणि न्या. एम. एस. कर्णिक यांनी नकार दिला.