वक्फ बोर्डातही गैरव्यवहार झाल्याची तक्रार

प्रतिनिधी/ बेंगळूर महर्षि वाल्मिकी विकास निगममध्ये गैरव्यवहार झाल्याची घटना ताजी असतानाच कर्नाटक राज्य वक्फ बोर्डातही बेकायदेशीरित्या पैसे हस्तांतरित केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुमारे 4 कोटी ऊ. हस्तांतरित केल्याप्रकरणी माजी सीईओ झुल्फिकारउल्ला यांच्या विरोधात वक्फ बोर्डाने तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात विद्यमान सीईओ मीर अहमद अब्बास यांनी हाय ग्राउंड्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली […]

वक्फ बोर्डातही गैरव्यवहार झाल्याची तक्रार

प्रतिनिधी/ बेंगळूर
महर्षि वाल्मिकी विकास निगममध्ये गैरव्यवहार झाल्याची घटना ताजी असतानाच कर्नाटक राज्य वक्फ बोर्डातही बेकायदेशीरित्या पैसे हस्तांतरित केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुमारे 4 कोटी ऊ. हस्तांतरित केल्याप्रकरणी माजी सीईओ झुल्फिकारउल्ला यांच्या विरोधात वक्फ बोर्डाने तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात विद्यमान सीईओ मीर अहमद अब्बास यांनी हाय ग्राउंड्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून मागील सीईओने राज्याच्या तिजोरीचे एकूण 8.03 कोटी ऊपयांचे नुकसान केले आहे, असा आरोप केला आहे.
कर्नाटक वॅक्फ बोर्डाच्या गुलबर्गा दर्ग्याच्या मालमत्तेवर सरकारने अतिक्रमण करून बोर्डाला 2.29 कोटी ऊपये दिले होते. याशिवाय वॅक्फ बोर्डाला धर्मादाय खात्याकडून 1.79 कोटी रुपये मिळाले होते. ही संपूर्ण रक्कम बेन्सेन टाऊन येथील इंडियन बँकेच्या एसबी खात्यात पैसे जमा करण्यात आले. परंतु 26 नोव्हेंबर 2016 रोजी चिक्कबळ्ळापूर जिल्ह्याच्या चिंतामणी येथील विजय बँकेतील वक्फ बोर्डाच्या नावाच्या खात्यावर पैसे हस्तांतरित झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.