मुख्य प्रवाहातील राजकारणातही दिव्यांगांचे प्रतिनिधित्व असण्याची गरज

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन पणजी : स्पाइनल कॉर्ड रिहॅब सेंटर आणि प्रधानमंत्री दिव्यांश केंद्र सुरू करत सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीच्या कार्यात गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) हॉस्पिटल दोन पावले पुढे आहे, ठदिव्यांग व्यक्ती विविध क्षेत्रांत चांगले काम करत आहेत, त्यामुळे मुख्य प्रवाहातील राजकारणातही दिव्यांग व्यक्तींचे प्रतिनिधित्व असण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत […]

मुख्य प्रवाहातील राजकारणातही दिव्यांगांचे प्रतिनिधित्व असण्याची गरज

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
पणजी : स्पाइनल कॉर्ड रिहॅब सेंटर आणि प्रधानमंत्री दिव्यांश केंद्र सुरू करत सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीच्या कार्यात गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) हॉस्पिटल दोन पावले पुढे आहे, ठदिव्यांग व्यक्ती विविध क्षेत्रांत चांगले काम करत आहेत, त्यामुळे मुख्य प्रवाहातील राजकारणातही दिव्यांग व्यक्तींचे प्रतिनिधित्व असण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट-गोवा,2024ला भेटीदरम्यान बोलताना केले. यावेळी त्यांच्यासोबत समाजकल्याण मंत्री  सुभाष फळदेसाई आणि राज्याचे दिव्यांगजन आयुक्त  गुऊप्रसाद पावसकर उपस्थित होते. गोव्याने या महोत्सवाचे आयोजन करणे हा अभिमानाचा क्षण असल्याचे सांगून त्यांनी महोत्सवातील सहभागी आणि आयोजकांशी संवाद साधला. डॉ. सावंत यांनी अधोरेखित केले की दिव्यांग व्यक्तींबाबत सांख्यकी संकलनाच्या अचूकता राखणे एक आव्हान आहे, पण ही अचूकता महत्त्वपूर्ण आहे. धोरण निर्मितीमध्ये लोकांच्या मदतीची आवश्यकता आहे. अचूक व नेमकी सांख्यकी माहिती धोरणकर्ते, वकील यांना दिव्यांगजनांच्या समस्या व त्यांचे वैविध्यपूर्ण अनुभव समजून घेण्यास सक्षम करते, समस्यांचे योग्य व प्रभावी निराकरण करणे आणि प्रभावी धोरणहस्तक्षेप तयार करणे शक्मय होते.