अधिकारीही नाहीत अन् सर्व्हरही गायब
तहसीलदार कार्यालयातील कारभाराबद्दल संताप : जिल्हाधिकारी लक्ष देणार का?
बेळगाव : तहसीलदार कार्यालयातून विविध कागदपत्रे दिली जातात. मात्र सर्व्हरची समस्या निर्माण झाल्याने कागदपत्रे मिळणे अशक्य झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेबरोबर शहरातील नागरिकांनाही या कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे अधिकारी गैरहजर आहेत तर या अधिकाऱ्यांबरोबरच आता सर्व्हरही गायब झाले आहे. त्यामुळे या प्रकाराकडे जिल्हाधिकारी लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तहसीलदार कार्यालयातून वारसा, जात व उत्पन्नाचा दाखला यासह इतर विविध योजनांची कागदपत्रे दिली जातात. मात्र सर्व्हरडाऊनचा फटका सर्वांनाच बसू लागला आहे. अर्ज केल्यानंतर संबंधित व्यक्तीला क्रमांक दिला जातो. त्या क्रमांकानंतर ओटीपी क्रमांक संगणकामार्फत मिळत असते. मात्र ओटीपी क्रमांकच मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे कोणतीच कागदपत्रे मिळेनाशी झाली आहेत. तेव्हा येथील सर्व्हरची समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे. सध्या निवडणुकीच्या कामामध्ये अधिकारी गुंतले आहेत. त्यातच येथील काम होत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा तातडीने सर्व्हरची समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे.
Home महत्वाची बातमी अधिकारीही नाहीत अन् सर्व्हरही गायब
अधिकारीही नाहीत अन् सर्व्हरही गायब
तहसीलदार कार्यालयातील कारभाराबद्दल संताप : जिल्हाधिकारी लक्ष देणार का? बेळगाव : तहसीलदार कार्यालयातून विविध कागदपत्रे दिली जातात. मात्र सर्व्हरची समस्या निर्माण झाल्याने कागदपत्रे मिळणे अशक्य झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेबरोबर शहरातील नागरिकांनाही या कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे अधिकारी गैरहजर आहेत तर या अधिकाऱ्यांबरोबरच आता सर्व्हरही गायब झाले आहे. त्यामुळे या प्रकाराकडे […]