नवी मुंबईत ‘डिस्नेलँड’च्या धर्तीवर ‘थीम पार्क’ उभारण्यात येणार
नवी मुंबईत 200 हेक्टर जागेवर ‘डिस्नेलँड’च्या धर्तीवर ‘थीम पार्क’ साकारण्यात येणार आहे. ‘मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हब’च्या अंतिम आराखड्यात हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.देशाच्या आर्थिक विकासवाढीसाठी ‘निती’ आयोगाच्या शिफारशीनुसार, ‘एमएमआर ग्रोथ हब’ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) ‘एमएमआर ग्रोथ हब’चा अंतिम आराखडा तयार केला आहे. आराखड्यानुसार, ‘एमएमआर’चा आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणून विकास करताना अनेकविध प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. त्या प्रकल्पाअंतर्गत औद्याोगिक, पर्यटन, शिक्षण, पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, आरोग्य, बंदर विकास अशा अनेकविध क्षेत्रांचा विकास केला जाणार आहे.अलिबागचा विकास जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून करण्यापासून ते मुंबई, ‘एमएमआर’मधील किल्ल्यांच्या संवर्धनाचा समावेश पर्यटन केंद्रात असणार आहे. तर राज्याप्रमाणेच देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘मुंबई आय’सह नवी मुंबईत ‘डिस्नेलँड’च्या धर्तीवर जागतिक दर्जाचे ‘थीम पार्क’ही प्रस्तावित करण्यात आले आहे.मुंबई, नवी मुंबई, ठाणे अर्थात ‘एमएमआर’मध्ये अनेक रिसॉर्ट, थीम पार्क, वॉटर पार्क आहेत. मात्र पहिल्यांदाच सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून नवी मुंबईत 200 हेक्टर जागेवर थीम पार्क उभारण्यात येणार आहे. यामध्ये रिसॉर्ट, अॅनिमेशन स्टुडिओ, राईड्स झोन, वॉटर पार्क अशा अनेक बाबींचा समावेश असेल.हेही वाचापालिका POPला ‘निगेटिव्ह लिस्ट’मध्ये टाकणार
पालिका मंडईची जागा भाडेतत्त्वावर देणार
Home महत्वाची बातमी नवी मुंबईत ‘डिस्नेलँड’च्या धर्तीवर ‘थीम पार्क’ उभारण्यात येणार
नवी मुंबईत ‘डिस्नेलँड’च्या धर्तीवर ‘थीम पार्क’ उभारण्यात येणार
नवी मुंबईत 200 हेक्टर जागेवर ‘डिस्नेलँड’च्या धर्तीवर ‘थीम पार्क’ साकारण्यात येणार आहे. ‘मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हब’च्या अंतिम आराखड्यात हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.
देशाच्या आर्थिक विकासवाढीसाठी ‘निती’ आयोगाच्या शिफारशीनुसार, ‘एमएमआर ग्रोथ हब’ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) ‘एमएमआर ग्रोथ हब’चा अंतिम आराखडा तयार केला आहे.
आराखड्यानुसार, ‘एमएमआर’चा आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणून विकास करताना अनेकविध प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. त्या प्रकल्पाअंतर्गत औद्याोगिक, पर्यटन, शिक्षण, पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, आरोग्य, बंदर विकास अशा अनेकविध क्षेत्रांचा विकास केला जाणार आहे.
अलिबागचा विकास जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून करण्यापासून ते मुंबई, ‘एमएमआर’मधील किल्ल्यांच्या संवर्धनाचा समावेश पर्यटन केंद्रात असणार आहे. तर राज्याप्रमाणेच देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘मुंबई आय’सह नवी मुंबईत ‘डिस्नेलँड’च्या धर्तीवर जागतिक दर्जाचे ‘थीम पार्क’ही प्रस्तावित करण्यात आले आहे.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे अर्थात ‘एमएमआर’मध्ये अनेक रिसॉर्ट, थीम पार्क, वॉटर पार्क आहेत. मात्र पहिल्यांदाच सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून नवी मुंबईत 200 हेक्टर जागेवर थीम पार्क उभारण्यात येणार आहे. यामध्ये रिसॉर्ट, अॅनिमेशन स्टुडिओ, राईड्स झोन, वॉटर पार्क अशा अनेक बाबींचा समावेश असेल.हेही वाचा
पालिका POPला ‘निगेटिव्ह लिस्ट’मध्ये टाकणारपालिका मंडईची जागा भाडेतत्त्वावर देणार