‘धूम’ चित्रपट पाहून भोपाळमध्ये म्युझियममधून 15 कोटींची नाणी चोरण्याचा बनवला प्लॅन

मध्य प्रदेशमधील भोपाळ जिल्ह्यात असलेले स्टेट म्युझियम मधून 15 करोड रुपयांचे पुरातात्विक सामान चोरी होण्यापासून थोडक्यात वाचला. चोरी केल्यानंतर आरोपीने 25 फूट उंच भिंत पार करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला व पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. …
‘धूम’ चित्रपट पाहून भोपाळमध्ये म्युझियममधून 15 कोटींची नाणी चोरण्याचा बनवला प्लॅन

मध्य प्रदेशमधील भोपाळ जिल्ह्यात असलेले स्टेट म्युझियम मधून 15 करोड रुपयांचे पुरातात्विक सामान चोरी होण्यापासून थोडक्यात वाचला. चोरी केल्यानंतर आरोपीने 25 फूट उंच भिंत पार करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला व पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपीजवळून म्यूजियम मधून चोरलेले सोने-चांदीचे आभूषण, शिक्के आणि इतर साहित्य जप्त केले. 

 

पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आरोपीने सांगितले की, धूम चित्रपट पाहून म्युझियम मधून चोरी करण्याचा प्लॅन बनवला. एवढेच नाही तर त्याने भिंतीवरून उडी मारण्यासाठी खांबावर चढण्याची प्रॅक्टिस देखील केली होती. ही चोरी यशस्वी कशी होईल हे पाहण्यासाठी हा आरोपी अनेक वेळेस या म्युझियम मध्ये येत होता. व सर्व रस्ते व्यवस्थित पाहून चोरीचा प्लॅन बनवला. 

 

आरोपीने सांगितले की गेल्या रविवार त्याने दुपारी म्युझियमचे तिकीट विकत घेतले व म्युझियम मध्ये दाखल झाला. यानंतर तो अनेक तास म्युझियमच्या जिन्याखाली लपून बसला. जेव्हा म्युझियम बंद झाले तेव्हा तो बाहेर निघाला आणि चोरी केली. त्याने पाहिले की बाहेर होमगार्ड आणि खासगी सुरक्षारक्षक उभे आहे तर त्याने यानंतर 25 फूट उंच भिंतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी राहिला. व तो तिथेच बसून राहिला.

 

मंगळवारी सकाळी म्युझियमचे कर्मचारी कामावर आपले तेव्हा त्यांनी पहिले की मोठी चोरी झाली आहे.  तर कर्मचारींनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलीस घटनास्थळी पोहचली व पाहणी केली असता या दरम्यान आरोपी त्यांना जखमी अवस्थेत आढळला. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता तो बिहारचा रहिवासी आहे असे समजले. व पुढील चौकशी सुरु आहे.

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source