Kolhapur News : मुरगूडमध्ये महालक्ष्मी नगरात चोरी; आरोपीला कर्नाटकातून अटक
मुरगूड पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान आरोपीला ताब्यात घेतले
मुरगूड : ५ ते ८ सप्टेंबर रोजी येथील महालक्ष्मी नगरात कुलूप बंद घरे असणाऱ्या प्रा. नंदकिशोर स्मार्त व राजन नाईक यांच्या घरी झालेल्या चोरी प्रकरणी कर्नाटकातून मुरगूड पोलिसांनी चोरट्याला अटक केली.लक्ष्मण मारूती नाईक (वय३३ असे होसूर) अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२५ मध्ये प्रा. नंदकिशोर स्मार्ट यांच्या घरी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर चोरून बंगल्यातील चांदीच्या देवदेवतांचेरा. दागिने व रोकडसह अन्य ऐवज लंपास केला होता. या शिवाय अन्य काही ठिकाणीही अशा वेळोवेळी चोऱ्या होत होत्या.पोलिसांनी या प्रकरणी तपास करूनही चोरटा सापडत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप होता. मुरगूड पोलिसांनी पेट्रोलिंग करताना लक्ष्मण नाईक यास ताब्यात घेतले. त्याच्या बोटांच्या ठशावरून प्रा. स्मार्त व डॉ. नाईक यांच्या घरातील चोरीची कबुली दिली आहे. चोरट्याने स्मार्त यांच्या घरातील डीव्हीआर नदीत फेकल्याचे सांगितले आहे. तर चांदीच्या दागिन्यांचा व त्याच्या साथीदाराचा शोध मुरगूड पोलीस घेत आहेत.
Home महत्वाची बातमी Kolhapur News : मुरगूडमध्ये महालक्ष्मी नगरात चोरी; आरोपीला कर्नाटकातून अटक
Kolhapur News : मुरगूडमध्ये महालक्ष्मी नगरात चोरी; आरोपीला कर्नाटकातून अटक
मुरगूड पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान आरोपीला ताब्यात घेतले मुरगूड : ५ ते ८ सप्टेंबर रोजी येथील महालक्ष्मी नगरात कुलूप बंद घरे असणाऱ्या प्रा. नंदकिशोर स्मार्त व राजन नाईक यांच्या घरी झालेल्या चोरी प्रकरणी कर्नाटकातून मुरगूड पोलिसांनी चोरट्याला अटक केली.लक्ष्मण मारूती नाईक […]
