नाट्यदिग्दर्शक,अभिनेते रणजित पाटील यांचं वयाच्या 42 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
नाट्यदिग्दर्शक,अभिनेते रणजित पाटील यांचं वयाच्या 42 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांना गेल्या काही महिन्यांपासून हृदयाशी संबंधित तक्रारी जाणवत होत्या त्यांच्यावर उपचार सुरु होते.
त्यांना राहत्याघरी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांनी जग सोडले. वयाच्या 42 व्या वर्षी त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ALSO READ: अभिनेत्री जुई गडकरींच्या आजोबांचे निधन
रणजित पाटील जर तर ची गोष्ट या नाटकाचे दिग्दर्शन करत होते. या नाटकात प्रिया बापट आणि उमेश कामत मुख्य भूमिकेत आहे. या नाटकाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ALSO READ: ‘बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये’- रिंकू राजगुरूची ‘आशा’ १९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
रणजीत पाटील यांचे शिक्षण मुंबईतील प्रसिद्ध रुईया महाविद्यालयात झाले होते. रुईयामधील एकांकिकांच्या दिग्दर्शनाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती.
ALSO READ: अभिनेत्री प्राजक्ता माळी फॅन्सवर रागावली
रणजित पाटील यांनी मराठी मालिकाविश्वात व रंगभूमीवर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. यासह त्यांनी अनेक तरुण रंगकर्मींना प्रोत्साहन देत त्यांना मार्गदर्शन सुद्धा केलं होतं.
त्यांनी झी मराठीची मालिका हृदयी प्रीत जागते या मालिकेत अभिनय केला.
त्यांच्या निधनाने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
Edited By – Priya Dixit
