आंबोलीतील दुचाकी अपघातात युवक जागीच ठार
वार्ताहर/ आंबोली
सावंतवाडी तालुक्यातील आंबोली- नांगरतासवाडी येथील इसावा वळणावर मोटरसायकल दगडावर आदळून झालेल्या अपघातात आदित्य भिकाजी कोरवी वय १९, रा- आजरा, जि. कोल्हापूर हा मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. हा अपघात सायंकाळी साधारण साडेपाच वाजण्याच्या सुमारास नांगरतास वळणावर घडला.मयत आदित्य भिकाजी कोरवी (वय १९ ) रा. आजरा आणि त्याचे मित्र ओंकार( कार्तिक) कारेकर( वय १९ )रा. रवळनाथ कॉलनी, आजरा, वेदांत कोंडूरसर (वय १६) रा. सुहाळे आजरा हे आणि इतर मित्र दुपारी आजरा येथून तीन वाजता सुटून कावळेसाद पॉइंट येथे आले होते. कावळेसाद पॉइंट पाहून झाल्यानंतर हे तिघेजण आणि त्यांचे सहकारी मित्र पुन्हा आजरा येथे जाण्यास निघाले असता वाटेत नांगरतास इसावा वळणावर त्यांची मोटर सायकल सुसाट वेगाने असल्याने वळणाचा अंदाज न आल्याने ते तिघेजण विरुद्ध दिशेला जाऊन पडले यात मोटर सायकलस्वार आदित्य याचे डोके दगडावर आदळून जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला तर पाठीमागे बसलेल्या ओंकार कारेकर आणि वेदांत कोंडूसकर यांना किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर पाठीमागे बसलेल्या त्याच्या सहकाऱ्यांनी तो जिवंत आहे ते पाहीले परंतु त्याची काहीच हालचाल नसल्याने ते घाबरून बाजुला पळून गेले. त्यानंतर आंबोली पोलीसांनी त्यांना गडदुवाडी स्टॉप येथून शोधून आणले. अपघाताची खबर ओंकार (कार्तिक) कारेकर यांनी आंबोली पोलीसात दिली. अपघाताची खबर मिळताच आंबोली पोलीस दूरक्षेत्रचे हवालदार दिपक शिंदे, पोलीस नाईक मनिष शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. तसेच मोटर सायकल अपघातात जखमी झालेल्या दोघांवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. आदिती पाटकर, डॉ. महेश जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केले .त्यांना किरकोळ जखमा झाल्या होत्या.
Home महत्वाची बातमी आंबोलीतील दुचाकी अपघातात युवक जागीच ठार
आंबोलीतील दुचाकी अपघातात युवक जागीच ठार
वार्ताहर/ आंबोली सावंतवाडी तालुक्यातील आंबोली- नांगरतासवाडी येथील इसावा वळणावर मोटरसायकल दगडावर आदळून झालेल्या अपघातात आदित्य भिकाजी कोरवी वय १९, रा- आजरा, जि. कोल्हापूर हा मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. हा अपघात सायंकाळी साधारण साडेपाच वाजण्याच्या सुमारास नांगरतास वळणावर घडला.मयत आदित्य भिकाजी कोरवी (वय १९ ) रा. आजरा आणि त्याचे मित्र ओंकार( कार्तिक) कारेकर( वय १९ )रा. […]