युवकांनी सद्यस्थितीचे गांभीर्य ओळखून भूमिका निभवावी!
मांद्रे येथील परिसंवादात वक्त्यांचा सूर : चौथे फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन
वार्ताहर /हरमल
युवकांनी सद्यस्थितीत अवती भवती घडणाऱ्या अनेकविध घटनांचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. त्या उपलब्ध परिस्थितीचे नेहमी दोहोबाजूंनी विमर्श करून योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे. घाईघाईत घेतलेला निर्णय मारक ठरू शकतो. त्यासाठी युवकांनी प्राप्त स्थितीत मानसिक संतुलन राखल्यास समाजात समता प्रस्थापित होऊ शकते, असा सूर परिसंवादात व्यक्त झाला. मांद्रे येथील कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सच्या सभागृहात आयोजित 4 थ्या फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलनातील ‘युवा वर्ग व समतावादी विचारांची गरज’ या विषयावर परिसंवादात सहभागी वक्त्यांनी व्यक्त केले. विचारांची देवाण घेवाण झाल्यासच परिपक्व विचार ऊजू होतो व त्याचा फायदा होतो. मोबाईलचा वापर हा अविभाज्य घटक बनला आहे. मात्र युवा वर्गाने त्याचा वापर ज्ञानवृद्धीसाठी करणे आवश्यक आहे. देशांत अवघेच धनाढ्य लोक असून 10 टक्के लोक 90 टक्के लोकांवर अधिराज्य गाजवित असल्याचे दिसून येते. देश जरी श्रीमंत यादीत असला तरी वास्तवात चित्र भयानक असून त्याची जाणीव युवकांनी अनुभवली पाहिजे व त्यादृष्टीने पावले उचलली पाहिजे, असे प्रा भारत बागकर यांनी व्यक्त केले.
युवकांनी समानतावादी बनावे : प्रा अऊण नाईक
युवकांनी आपली कर्तव्य व जबाबदारी योग्य पद्धतीने निभवल्यास समाजात समानता प्रस्थापित होईल. साहित्य समाजाला घडवीत असते. आईवडिलांनी मुलांना प्रोत्साहन देताना मुले बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. साने गुऊजी,चिपळूणकर, कवी नारायण सुर्वे आदींच्या उदहरणासहित प्रा अऊण नाईक यांनी युवकांना समानतावादी बनण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे, असे सांगितले.
नागरिक हक्क बजावतो, कर्तव्य विसरतो : डॉ प्रवीण नागमोडे
भारतीय संविधानात नागरिकांना हक्क व कर्तव्ये बहाल केली असून त्याचा उपयोग योग्यप्रकारे होत नसल्याची खंत आहे. नागरिक हक्क बजावतो, मात्र कर्तव्ये विसरत चालला आहे. युवकांनी देशासाठी आपला अनुभवाचा फायदा करून, समानतेच्या लढ्यात झोकून द्यायला हवे. देशाचे माजी कायदामंत्री रमाकांत खलप यांनी देशाचं सर्वोच्च पद भूषविले आहे. अशा ज्येष्ठ राजकारणी कमी समाजसेवकाची जास्त भूमिका बजविलेल्या अॅड. रमाकांन खलप याना भारत रत्न किताब देणे उचित होते, मात्र प्रत्येक बाबतीत राजकारण पाहिले जात असल्याचे दु:ख आहे, असे डॉ नागमोडे यांनी व्यक्त केले. प्रारंभी छत्रपती शाहू प्रतिष्ठानतर्फे परिसंवादात सहभागी वक्त्यांचे संविधान प्रत व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. आनंद जाधव यानी सूत्रनिवेदन केले. त्यांनीच आभार मानले.
Home महत्वाची बातमी युवकांनी सद्यस्थितीचे गांभीर्य ओळखून भूमिका निभवावी!
युवकांनी सद्यस्थितीचे गांभीर्य ओळखून भूमिका निभवावी!
मांद्रे येथील परिसंवादात वक्त्यांचा सूर : चौथे फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन वार्ताहर /हरमल युवकांनी सद्यस्थितीत अवती भवती घडणाऱ्या अनेकविध घटनांचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. त्या उपलब्ध परिस्थितीचे नेहमी दोहोबाजूंनी विमर्श करून योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे. घाईघाईत घेतलेला निर्णय मारक ठरू शकतो. त्यासाठी युवकांनी प्राप्त स्थितीत मानसिक संतुलन राखल्यास समाजात […]