तरुणाने केले किंग कोब्रा सापाला किस
Photo- Instagram
सापाचं नाव ऐकल्यावर अंगाचा थरकाप उडतो. समोर साप आल्यावर काय होणार. मात्र काही जण काही वेगळं करण्याच्या नादात सापाशी खेळतात आणि आपला जीव धोक्यात घालतात. सध्या सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि लाईक्स मिळवण्यासाठी व्हिडीओ टाकले जातात. सध्या असाच एक धोकादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक तरुण चक्क किंग कोब्र्याच्या कपाळावर किस करत आहे.
किंग कोब्रा हा सर्वात विषारी साप म्हणून ओळखला जातो. त्याने दंश केल्यावर माणूस क्षणातच दगावतो. मात्र या तरुणाने चक्क त्याच्या कपाळी किस केलं आहे.
अक्षरश: काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओ मध्ये एक विषारी किंगकोब्रा दिसत आहे. तो तरुण हळू- हळू सापाच्या जवळ जातो आणि त्याच्या कपाळावर किस करतो. साप हल्ला करेल की काय असं वाटते मात्र साप त्याच्यावर हल्ला करत नाही. हा व्हिडीओ काळजाचा ठोका चुकवणार आहे.
View this post on Instagram
A post shared by ಉರಗ ರಕ್ಷಕ ನರಸಿಂಹ (@snake_lover_narasimha)
हा व्हिडीओ snake_lover_narasimha या अकाऊंटने शेअर केला आहे. या व्हिडीओला सुमारे दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे. या वर अनेक जण आपली प्रतिक्रिया देत आहे.
Edited by – Priya Dixit