कॅम्प येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाला सुरुवात
1 लाख लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणार
प्रतिनिधी/ बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्ड व्याप्तीतील फिश मार्केट येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मटण बुचर रोड येथे 1 लाख लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करून या पाण्याचा उद्यान, तसेच स्वच्छतेसाठी पुनर्रवापर करण्यात येणार आहे.
पाण्याच्या व्यवस्थापनासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डकडून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. नवीन तलावांच्या खोदाईसोबतच असलेल्या पाण्याचा पुनर्रवापर केला जाणार आहे. कॅम्प परिसरातील सांडपाणी एकत्रितरित्या जमा करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. यामुळे सांडपाण्याच्या व्यवस्थापनासोबतच त्याचा पुनर्रवापर करणे सोयीचे ठरणार आहे. प्रक्रिया केलेले पाणी कॅम्पमधील उद्याने, तसेच फिश मार्केट व इतर ठिकाणी स्वच्छतेसाठी वापरले जाणार आहे.
मुख्य पोस्ट ऑफिस रोडवरील कर्मचारी वसाहतीजवळ 35 हजार लिटर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पदेखील उभारला जाणार आहे. त्यापूर्वी फिश मार्केट येथील सांडपाणी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मागील चार दिवसांपासून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. एकूण 15 फूट खोल व 45 फूट रुंद आकाराचा सांडपाणी प्रकल्प उभारला जात आहे. येत्या काही दिवसांत सांडपाणी प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या सहकार्यातून व अशोक आयर्न संचलित जय भारत फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविला जात आहे. फिश मार्केट व पोस्ट ऑफिस रोड येथील दोन्ही सांडपाणी प्रकल्पाला मिळून 76 लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
Home महत्वाची बातमी कॅम्प येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाला सुरुवात
कॅम्प येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाला सुरुवात
1 लाख लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणार प्रतिनिधी/ बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड व्याप्तीतील फिश मार्केट येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मटण बुचर रोड येथे 1 लाख लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करून या पाण्याचा उद्यान, तसेच स्वच्छतेसाठी पुनर्रवापर करण्यात येणार आहे. पाण्याच्या व्यवस्थापनासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डकडून अनेक उपक्रम […]