आंबोली घाटात कोसळलेला दगड हटविण्याचे काम सुरु

आंबोली । वार्ताहर आंबोली घाटात पूर्वी दरड कोसळलेल्या जागेपासून काही अंतरावर एक भला मोठा दगड आज थेट रस्त्यावर कोसळला. सकाळी ८ च्या सुमारास ही घटना घडली. वाहन चालकांनी याबाबतची माहिती आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई यांना दिली. त्यानंतर त्यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती दिली. सध्या जेसीबीच्या सहाय्याने हा दगड हटविण्याचे काम सुरु आहे. […]

आंबोली घाटात कोसळलेला दगड हटविण्याचे काम सुरु

आंबोली । वार्ताहर
आंबोली घाटात पूर्वी दरड कोसळलेल्या जागेपासून काही अंतरावर एक भला मोठा दगड आज थेट रस्त्यावर कोसळला. सकाळी ८ च्या सुमारास ही घटना घडली. वाहन चालकांनी याबाबतची माहिती आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई यांना दिली. त्यानंतर त्यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती दिली. सध्या जेसीबीच्या सहाय्याने हा दगड हटविण्याचे काम सुरु आहे. सुदैवाने या घटनेवेळी त्या ठिकाणी कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. सद्यस्थितित या भागातून एकेरी वाहतूक सुरू असल्याची माहिती दत्तात्रय देसाई यांनी दिली आहे.