अणुस्कुरा घाटात कोसळलेली दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर
सायंकाळी उशिरा वाहतूक सुरू होण्याची शक्यता
राजापूर / वार्ताहर
राजापूर-कोल्हापूरला जोडणा-या अणुस्कुरा घाटात गुरूवारी रात्री दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. बांधकाम विभागाकडून दरड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र भले मोठे दगड रस्त्यात कोसळल्याने दरड हटविण्याच्या कामाला विलंब होत असून शुकवारी सायंकाळपर्यंत दरड हटविण्याचे काम पूर्ण होऊन वाहतूक सुरू होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान शुकवारी दुपारपर्यंत मोटारसायकल आणि लहान चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू झाली होती.
Home महत्वाची बातमी अणुस्कुरा घाटात कोसळलेली दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर
अणुस्कुरा घाटात कोसळलेली दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर
सायंकाळी उशिरा वाहतूक सुरू होण्याची शक्यता राजापूर / वार्ताहर राजापूर-कोल्हापूरला जोडणा-या अणुस्कुरा घाटात गुरूवारी रात्री दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. बांधकाम विभागाकडून दरड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र भले मोठे दगड रस्त्यात कोसळल्याने दरड हटविण्याच्या कामाला विलंब होत असून शुकवारी सायंकाळपर्यंत दरड हटविण्याचे काम पूर्ण होऊन वाहतूक सुरू होईल, असा […]
