Sangli : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी-बनपुरी रस्त्याचे काम निकृष्ट!

                   मिटकीच्या सरपंचांची निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार आटपाडी : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी ते बनपुरी दरम्यान सुरू असणाऱ्या सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट सुरू असून त्या कामाची चौकशी करून कारवाईसाठी मिटकी ग्रामपंचायतने आंदोलनाचा इशारा दिला आहे. मिटकीच्या सरपंच रूपाली कोळपे यांनी ग्रामपंचायतमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत याबाबत तक्रार केली आहे. खरसुंडी […]

Sangli : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी-बनपुरी रस्त्याचे काम निकृष्ट!

                   मिटकीच्या सरपंचांची निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी ते बनपुरी दरम्यान सुरू असणाऱ्या सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट सुरू असून त्या कामाची चौकशी करून कारवाईसाठी मिटकी ग्रामपंचायतने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मिटकीच्या सरपंच रूपाली कोळपे यांनी ग्रामपंचायतमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत याबाबत तक्रार केली आहे. खरसुंडी ते बनपुरी दरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे. सदरचे काम निकृष्ट होत आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्यावर मुरूमाऐवजी मातीचा वापर केला जात असून या निकृष्ट कामाची दहा दिवसात चौकशी करूनअधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर कारवाई करावी. तसेच रस्त्याच्या कामासाठी खुदाई करताना शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याच्या पाईपलाईन, लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन ठेकेदारांनी तोडल्या आहेत.
लोकांच्या पाईपलाईन रस्त्याच्या नावाखाली तोडलेल्या असतानाही त्या जोडून देण्याची जबाबदारी ठेकेदारांसह अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. त्यामुळे सदर कामाची चौकशी करून लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक तात्काळ करावी, अन्यथा 24  नोव्हेंबर पासून आटपाडी तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थ, शेतकऱ्यांसह आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मिटकी ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच रूपाली कोळपे यांनी दिला आहे.