मिठी नदीच्या तिसऱ्या टप्प्यातील कामाला मुहूर्त मिळेना

मुंबईत (mumbai) बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली. यावेळेस मिठी नदीने (mithi) 3.60  मिटरची पातळी गाठली. मिठी नदीची (mithi river) सरासरी अंतिम पातळी ही 4.20 आहे. नदीच्या वाढत्या पातळीमुळे आजूबाजूच्या झोपड्यातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले. यामुळे मिठी नदीच्या विकासाची तसेच तिच्या स्वच्छेतीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मिठी नदीचा चार टप्प्यात विकास होत असून आतापर्यंत फक्त पहिला टप्पाच पूर्ण झाला आहे. त्यापैकी तीन हजार कोटी रुपयांच्या महत्वाच्या असलेल्या तिसऱ्या टप्प्याला गेल्या दोन वर्षात मुहूर्तच मिळालेला नाही.  महापालिकेने चार वेळा निविदा काढल्या होत्या. मात्र तरीही त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. आता पुन्हा एकदा निविदा काढण्यासाठी मुंबई महापालिकेकडून (bmc) अद्याप कोणताही विचार करण्यात आलेला नाही. या टप्प्यात मिठी नदीलगत असलेली सुमारे दोन हजार अतिक्रमणे आणि ती हटवण्यात महापालिकेला अपयश आले. त्यामुळे कंत्राटदार (contractor) त्याकडे पाठ फिरवत असल्याचे सूत्रांनी सांगितले. परिणामी, मिठी नदीच्या तिसऱ्या टप्प्यातील विकास होऊ शकलेला नाही. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहितेमुळे हा विकास रखडण्याची शक्यता आहे. मिठी नदीचा प्रवाह हा पूर्व, पश्चिम उपनगराबरोबरच मुख्य शहरातूनही आहे. मिठी नदीने पावसाळ्यात धोक्याची पातळी ओलांडल्यास मुंबईत पाणी भरते. त्यामुळे दरवर्षी नदीतील गाळ काढण्याची कामे हाती घेतली जातात.  मुंबई महानगरपालिकेकडून या नदीतील सांडपाणी आणि रासायनिक दूषित पाणी रोखण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजनाही केल्या जात आहेत. यात चार टप्प्यात विकासकामे हाती घेण्यात आली आहेत.  तिसऱ्या टप्प्यात रस्त्याच्या कामात 25 फ्लड गेट पंप बांधणे, सुशोभिकरण करणे, भरती आणि ओहोटीच्या वेळी कोरड्या हवेचा प्रवाह रोखणे इत्यादी कामे केली जाणार आहेत. मात्र या टप्प्यासाठी मिठी नदी लगत असलेली जवळपास दोन हजार अतिक्रमणे हटवावी लागणार आहेत.  दुसऱ्या टप्प्यातील विकासकामात असलेली काही अतिक्रमण काढण्यात आली होती. मात्र तिसऱ्या टप्प्यात त्याचा अडथळा येत असून ती हटवण्यात महापालिकेला अपयश आले आहे. तसेच मिठी नदीच्या तिसऱ्या टप्प्यातील (third phase) कामांसाठी 2 हजार 556 कोटी खर्च येणार होता. आता हाच खर्च 3 हजार 67 कोटी 55 लाख रुपयांवर गेला आहे. 2024-25 मधील महापालिका अर्थसंकल्पात मिठी नदीच्या टप्पा दोन, तीन आणि चारमधील कामांसाठी 451 कोटी 75 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.हेही वाचा मुंबई-पुणे अंतर कमी होणार आमदार सुनील प्रभू यांची महापालिका आयुक्तांकडे तक्रार

मिठी नदीच्या तिसऱ्या टप्प्यातील कामाला मुहूर्त मिळेना

मुंबईत (mumbai) बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली. यावेळेस मिठी नदीने (mithi) 3.60  मिटरची पातळी गाठली. मिठी नदीची (mithi river) सरासरी अंतिम पातळी ही 4.20 आहे. नदीच्या वाढत्या पातळीमुळे आजूबाजूच्या झोपड्यातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले. यामुळे मिठी नदीच्या विकासाची तसेच तिच्या स्वच्छेतीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.मिठी नदीचा चार टप्प्यात विकास होत असून आतापर्यंत फक्त पहिला टप्पाच पूर्ण झाला आहे. त्यापैकी तीन हजार कोटी रुपयांच्या महत्वाच्या असलेल्या तिसऱ्या टप्प्याला गेल्या दोन वर्षात मुहूर्तच मिळालेला नाही. महापालिकेने चार वेळा निविदा काढल्या होत्या. मात्र तरीही त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. आता पुन्हा एकदा निविदा काढण्यासाठी मुंबई महापालिकेकडून (bmc) अद्याप कोणताही विचार करण्यात आलेला नाही. या टप्प्यात मिठी नदीलगत असलेली सुमारे दोन हजार अतिक्रमणे आणि ती हटवण्यात महापालिकेला अपयश आले. त्यामुळे कंत्राटदार (contractor) त्याकडे पाठ फिरवत असल्याचे सूत्रांनी सांगितले.परिणामी, मिठी नदीच्या तिसऱ्या टप्प्यातील विकास होऊ शकलेला नाही. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहितेमुळे हा विकास रखडण्याची शक्यता आहे. मिठी नदीचा प्रवाह हा पूर्व, पश्चिम उपनगराबरोबरच मुख्य शहरातूनही आहे. मिठी नदीने पावसाळ्यात धोक्याची पातळी ओलांडल्यास मुंबईत पाणी भरते. त्यामुळे दरवर्षी नदीतील गाळ काढण्याची कामे हाती घेतली जातात. मुंबई महानगरपालिकेकडून या नदीतील सांडपाणी आणि रासायनिक दूषित पाणी रोखण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजनाही केल्या जात आहेत. यात चार टप्प्यात विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. तिसऱ्या टप्प्यात रस्त्याच्या कामात 25 फ्लड गेट पंप बांधणे, सुशोभिकरण करणे, भरती आणि ओहोटीच्या वेळी कोरड्या हवेचा प्रवाह रोखणे इत्यादी कामे केली जाणार आहेत. मात्र या टप्प्यासाठी मिठी नदी लगत असलेली जवळपास दोन हजार अतिक्रमणे हटवावी लागणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील विकासकामात असलेली काही अतिक्रमण काढण्यात आली होती. मात्र तिसऱ्या टप्प्यात त्याचा अडथळा येत असून ती हटवण्यात महापालिकेला अपयश आले आहे.तसेच मिठी नदीच्या तिसऱ्या टप्प्यातील (third phase) कामांसाठी 2 हजार 556 कोटी खर्च येणार होता. आता हाच खर्च 3 हजार 67 कोटी 55 लाख रुपयांवर गेला आहे. 2024-25 मधील महापालिका अर्थसंकल्पात मिठी नदीच्या टप्पा दोन, तीन आणि चारमधील कामांसाठी 451 कोटी 75 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.हेही वाचामुंबई-पुणे अंतर कमी होणारआमदार सुनील प्रभू यांची महापालिका आयुक्तांकडे तक्रार

Go to Source