Sangli News | आष्ट्यात सोमवारचा आठवडी बाजार पुन्हा मूळ ठिकाणी
मध्यवर्ती भागात बाजार भरल्याने ग्राहकांना सोय
आष्टा – आष्टा शहरातील मध्यवर्ती भागातील नागरिकांची आणि विशेषतः महिलांची मागणी लक्षात घेऊन, सोमवारचा आठवडा बाजार पुन्हा जुन्या मूळ जागेवर म्हणजेच नगरपालिका परिसर आणि ज्योति लग चौक परिसरात भरवण्याचे निर्देश लोकनियुक्त नगराध्यक्ष विशाल शिंदे यांनी दिले आहेत.
या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाहतुकीचा आणि नियोजनाचा प्रश्न मार्गी लागला असून महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. वाहतूक कोंडीला बसणार लगाम काही काळापासून हा आठवडा बाजार अंबाबाई मंदिर, हुतात्मा बैंक आणि जैन श्वेतांबर मंदिर या परिसरात भरत होता. मात्र, बाजार आष्टा आष्टा येथे नगराध्यक्ष विशाल शिंदे, उपनगराध्यक्ष दिलीप वम्याणी यांच्या पुढाकाराने सोमवारचा आठवडी बाजार पूर्ववत सुरू झाला.
मुख्य रस्त्यावर येत असल्याने या भागात मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत होती. वाहनांच्या गर्दीमुळे ग्राहक आणि विक्रेते यांच्यात वादाचे प्रसंग वारंवार घडत होते. ही बाब लक्षात घेऊन मध्यवर्ती भागातील बहुसंख्य महिलांनी नगराध्यक्ष विशाल शिंदे यांची भेट घेऊन बाजार मूळ जागी स्थलांतरित करण्याची विनंती केली होती.
प्रशासनाची तत्पर कार्यवाही
महिलांच्या निवेदनाची गंभीर दखल घेत नगराध्यक्ष विशाल शिंदे, उपनगराध्यक्ष दिलीप वम्याणी यांनी प्रशासनाला सूचना दिल्या. मुख्याधिकायांनी कार्यवाही करत सोमवारचा बाजार मूळ ठिकाणी भरवण्याचे आदेश काढले. त्यानुसार आजचा बाजार नगरपालिका आणि ज्योतिलिंग चौक परिसरात उत्साहात भरला. नगराध्यक्ष विशाल शिंदे म्हणाले, शहरातील वाहतुकीची समस्या सोडवणे आणि महिला भगिनींना सुरक्षितपणे खरेदी करता येणे ही आमची प्राथमिकता आहे. नागरिकांच्या सोयीसाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.
उपनगराध्यक्ष वग्याणी म्हणाले, गेली अनेक वर्षापासून नगरपालिका चौकात भरणारा बाजार हा दुसरीकडे भरत असल्याने नागरिकांची तसेच महिला वर्गाची मोठी अडचण झाली होती. हा बाजार पूर्वत नगरपालिका चौकात भरावा, अशी नागरिक आणि महिला वर्गाची इच्छा होती. याचा विचार करून पालिकेच्या सहकायनि सोमवारचा आठवडी बाजार पूर्ववत नगरपालिका चौकात भरवण्यास सुरुवात केली आहे. यास व्यापारी आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे.
Home महत्वाची बातमी Sangli News | आष्ट्यात सोमवारचा आठवडी बाजार पुन्हा मूळ ठिकाणी
Sangli News | आष्ट्यात सोमवारचा आठवडी बाजार पुन्हा मूळ ठिकाणी
मध्यवर्ती भागात बाजार भरल्याने ग्राहकांना सोय आष्टा – आष्टा शहरातील मध्यवर्ती भागातील नागरिकांची आणि विशेषतः महिलांची मागणी लक्षात घेऊन, सोमवारचा आठवडा बाजार पुन्हा जुन्या मूळ जागेवर म्हणजेच नगरपालिका परिसर आणि ज्योति लग चौक परिसरात भरवण्याचे निर्देश लोकनियुक्त नगराध्यक्ष विशाल […]
