राकसकोप जलाशयाची पाणीपातळी खालावली
वार्ताहर /तुडये
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाची पाणीपातळी खालावली आहे. राकसकोप परिसरात बुधवारी सकाळी 1.8 मि. मी. पावसाची नोंद झाली असून पाणीपातळी 2451.15 फूट झाली आहे. मागीलवर्षी याचदिवशी पाणीपातळी 2447.95 फूट होती. आतापर्यंत एकूण 238.9 मि.मी. पाऊस झाला आहे. मागीलवर्षी 135.9 मि.मी. पाऊस झाला होता. अजूनही डेडस्टॉकवरील 3 फूट पाणी शहराला वापरण्यास मिळणार आहे.
यावर्षी या परिसरात पावसाने आतापर्यंत दडी मारली आहे. एक जूनपासून आजपर्यंत 86.4 मि.मी. तुरळक असा पाऊस झाला. एकूण 237-1 मि.मी पाऊस झाला आहे. मागीलवर्षी 19 जूनपर्यंत 135-9 मि. मी. पाऊस झाला होता. तर पाणीपातळी 2448-10 फूट इतकी कमी होती. जून महिन्यातील 18 दिवसांत सव्वादोन फूट पाणीसाठा बेळगाव शहराला पुरवण्यात आला आहे. शिल्लक पाणीसाठ्याचा विचार करता अजूनही 20 दिवस डेडस्टॉकवरील पाणी पुरणार आहे. त्यानंतर डेडस्टॉकमधील सहा फुटापर्यंतचे पाणी उपसा करता येते. मात्र त्यासाठी विद्युतपंपाचा वापर करावा लागणार आहे. सध्या शहराला दीड इंच प्रतिदिवस पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
Home महत्वाची बातमी राकसकोप जलाशयाची पाणीपातळी खालावली
राकसकोप जलाशयाची पाणीपातळी खालावली
वार्ताहर /तुडये बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाची पाणीपातळी खालावली आहे. राकसकोप परिसरात बुधवारी सकाळी 1.8 मि. मी. पावसाची नोंद झाली असून पाणीपातळी 2451.15 फूट झाली आहे. मागीलवर्षी याचदिवशी पाणीपातळी 2447.95 फूट होती. आतापर्यंत एकूण 238.9 मि.मी. पाऊस झाला आहे. मागीलवर्षी 135.9 मि.मी. पाऊस झाला होता. अजूनही डेडस्टॉकवरील 3 फूट पाणी शहराला वापरण्यास मिळणार आहे. […]