राकसकोप जलाशयातील पाणीपातळी मागीलवर्षाच्या तुलनेत अडीच फुटाने जादा
19 फूट पाणीसाठा शिल्लक : मेपर्यंत शहराला पाणीपुरवठा होण्याची शक्यता
वार्ताहर /तुडये
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयातील पाणीपातळी मागील वर्षाच्या मानाने अडीच फुटाने जादा आहे. आतापर्यंत जलाशयातील 9 फूट पाणीसाठा शहराला पुरवण्यात आला आहे. तर डेडस्टॉकपर्यंतचा 19 फूट पाणीसाठा शहराला पुरविण्यासाठी उपलब्ध आहे. जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर 9 फूट पाणीसाठा हा चार महिने पुरला आहे. पुढील मार्च, एप्रिल व मे महिन्यात शिल्लक 19 फूट पाणीसाठा हा मुबलक ठरणारा असल्याने यावर्षी पाणीटंचाईची समस्या काही प्रमाणात कमी जाणवणार आहे. 19 फूट पाणीसाठ्यानंतर डेडस्टॉकमधील पाणी हे किमान 25 दिवस शहराला नक्कीच पुरणारे आहे. याचा अंदाज मागीलवर्षी व सन 2019 साली पाणीपुरवठा मंडळाला आला आहे. मागील वर्षीही डेडस्टॉकमधील पाणी उचल करण्याची तयारी पाणीपुरवठा मंडळाने केली होती. 1963 साली उभारण्यात आलेल्या या जलाशयात सभोवती असलेल्या शेतजमिनी आणि नदी-नाल्यांतून मोठ्या प्रमाणात जलाशयाला मिळालेल्या मातीचे रुपांतर चिखल-गाळात झाल्याने पाणी साठवणीच्या क्षमतेत कमालीची घट झाली आहे. प्रशासनाने या गाळाबाबत आजपर्यंत कोणतीच ठोस उपाययोजना केली नसल्याने दरवर्षी पाणीटंचाईची गंभीर समस्या शहराला जाणवते.
पाणीपातळी…
बुधवारी सकाळी जलाशयाची पाणीपातळी ही 2467.10 फूट इतकी नोंद झाली. मागीलवर्षी याच तारखेला पाणीपातळी 2464.70 फूट इतकी होती.
Home महत्वाची बातमी राकसकोप जलाशयातील पाणीपातळी मागीलवर्षाच्या तुलनेत अडीच फुटाने जादा
राकसकोप जलाशयातील पाणीपातळी मागीलवर्षाच्या तुलनेत अडीच फुटाने जादा
19 फूट पाणीसाठा शिल्लक : मेपर्यंत शहराला पाणीपुरवठा होण्याची शक्यता वार्ताहर /तुडये बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयातील पाणीपातळी मागील वर्षाच्या मानाने अडीच फुटाने जादा आहे. आतापर्यंत जलाशयातील 9 फूट पाणीसाठा शहराला पुरवण्यात आला आहे. तर डेडस्टॉकपर्यंतचा 19 फूट पाणीसाठा शहराला पुरविण्यासाठी उपलब्ध आहे. जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर 9 फूट पाणीसाठा हा चार महिने पुरला […]