प्रतीक्षा संपली…आज निर्णय सकाळी 8 वाजता
मतमोजणीला होणार प्रारंभ : दुपारपर्यंत निकाल शक्य
प्रतिनिधी/ बेळगाव
लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन जवळपास महिना लोटत आला आहे. त्यामुळे मतमोजणीची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. मतदान झाल्यानंतर उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. ही प्रतीक्षा आता संपणार असून आज निर्णय होणार आहे.
चिकोडी लोकसभा मतदारसंघातून जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या विरोधात भाजपचे विद्यमान खासदार आण्णासाहेब जोल्ले व बेळगाव लोकसभा मतदारसंघातून महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांच्यातील लढती रंगतदार ठरणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघांतील निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या बेळगाव व चिकोडी लोकसभा मतदारसंघात या निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे. राज्याच्या राजकारणातही बेळगाव जिल्ह्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षासह भाजपलाही ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. दोन मातब्बर मंत्र्यांच्या मुलांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आल्याने सदर नेत्यांनी मुलांच्या विजयासाठी मतदारसंघ पिंजून काढले आहेत. त्यामुळे मतदारांमध्येही निकालाची कमालीची उत्सुकता लागून आहे. एक्झिटपोलच्या माध्यमातून निवडणुकीच्या निकालाचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. असे असले तरी प्रत्यक्ष मतमोजणीनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार दि. 7 मे रोजी मतदान घेण्यात आले होते. तर मंगळवार दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. मंगळवारी निकाल स्पष्ट होणार असल्याने गुलाल कोणाचा? हे स्पष्ट होणार आहे. यासाठी आरपीडी महाविद्यालयातील मतमोजणी केंद्रावर जिल्हा प्रशासनाकडून मतमोजणीसाठी जय्यत तयारी केली असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून दि. 4 रोजी दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होणार असल्याचे निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. 20 ते 21 फेऱ्यांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण होईल, असे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरात 144 कलम जारी करण्यात आला आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सोमवारी सायंकाळपासून पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. मतमोजणी केंद्रासह परिसरात व महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. आरपीडी महाविद्यालयामध्ये मतमोजणी करण्यात येणार असल्याने केंद्राबाहेर राजकीय पक्षांच्या समर्थकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. आरपीडी क्रॉस ते गोवावेसकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील दुभाजकावर बॅरिकेड्स लावून बंदोबस्त करण्यात आला आहे.
Home महत्वाची बातमी प्रतीक्षा संपली…आज निर्णय सकाळी 8 वाजता
प्रतीक्षा संपली…आज निर्णय सकाळी 8 वाजता
मतमोजणीला होणार प्रारंभ : दुपारपर्यंत निकाल शक्य प्रतिनिधी/ बेळगाव लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन जवळपास महिना लोटत आला आहे. त्यामुळे मतमोजणीची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. मतदान झाल्यानंतर उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. ही प्रतीक्षा आता संपणार असून आज निर्णय होणार आहे. चिकोडी लोकसभा मतदारसंघातून जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या काँग्रेस उमेदवार प्रियांका […]