विशाळगड घटनेचे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर फौजदारी; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आदेश

कोल्हापूर प्रतिनिधी किल्ले विशाळगड येथील अतिक्रमणमुक्त मोहीम आणि त्यानंतरच्या घटनेचे चित्रण, फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.यामुळे समाजात तेढ निर्माण होऊन तणाव वाढत आहे.या पार्श्वभूमीवर कायदा -सुव्यवस्था राखण्यासाठी समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह चित्रीकरण टाकणारे फौजदारी कारवाईस पात्र असतील असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आदेशात म्हंटले आहे. जिल्हयातील किल्ले विशाळगड येथील अनाधिकृत अतिक्रमणा बाबत काही असामाजिक घटक समाजात तणाव […]

विशाळगड घटनेचे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर फौजदारी; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आदेश

कोल्हापूर प्रतिनिधी
किल्ले विशाळगड येथील अतिक्रमणमुक्त मोहीम आणि त्यानंतरच्या घटनेचे चित्रण, फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.यामुळे समाजात तेढ निर्माण होऊन तणाव वाढत आहे.या पार्श्वभूमीवर कायदा -सुव्यवस्था राखण्यासाठी समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह चित्रीकरण टाकणारे फौजदारी कारवाईस पात्र असतील असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आदेशात म्हंटले आहे.
जिल्हयातील किल्ले विशाळगड येथील अनाधिकृत अतिक्रमणा बाबत काही असामाजिक घटक समाजात तणाव निर्माण करणारे चुकीचे संभाषण, चित्रफित सामाजिक माध्यमाद्वारे प्रसारित करुन सामाजिक अस्थिरता, तसेच, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिह्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठे जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूर जिह्यात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये 17 जुलै 2024 दुपारी 2 वाजल्यापासून इंस्टाग्राम, व्हॉटसअॅप, ट्वीटर, फेसबुक इत्यादी समाज माध्यमाद्वारे अफवा,जातीय द्वेष पसरवणारे संदेश पाठविणे, खोटी माहिती पोस्ट किंवा फॉरवर्ड करण्यास तसेच यासंबंधीचे बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग प्रदर्शित करण्यास मनाई केली आहे.या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहील, असे जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी नमूद केले आहे.