जाखलेत जेष्ठ नागरिकांचा अनोखा विवाह ठरतोय कौतुकाचा सोहळा

ऐशी वर्षाचा वर,पासष्ट वर्षाची वधू; अवनी संस्थेच्या सहाय्याने विवाह वारणानगर / प्रतिनिधी जाखले ता. पन्हाळा येथील ऐशी वर्षाचा वर,पासष्ट वर्षाची वधू या जेष्ठ नागरिकांचा अनोखा विवाह कौतुकाचा सोहळा ठरू लागला आहे.भास्कर बंडू गायकवाड व कमल नामदेव पाटील असे या नव दापंत्यांचे नाव आहे. भास्कर गायकवाडहे आपले वडील मुंबई येथील खाजगी कंपनीतून सेवानिवृत्त झाले ते जाखले […]

जाखलेत जेष्ठ नागरिकांचा अनोखा विवाह ठरतोय कौतुकाचा सोहळा

ऐशी वर्षाचा वर,पासष्ट वर्षाची वधू; अवनी संस्थेच्या सहाय्याने विवाह

वारणानगर / प्रतिनिधी

जाखले ता. पन्हाळा येथील ऐशी वर्षाचा वर,पासष्ट वर्षाची वधू या जेष्ठ नागरिकांचा अनोखा विवाह कौतुकाचा सोहळा ठरू लागला आहे.भास्कर बंडू गायकवाड व कमल नामदेव पाटील असे या नव दापंत्यांचे नाव आहे.
भास्कर गायकवाडहे आपले वडील मुंबई येथील खाजगी कंपनीतून सेवानिवृत्त झाले ते जाखले गावी एकटेच राहतात मुलगा नोकरीमुळे तो मुंबईत राहतो मुलींचे विवाह झाले १४ वर्षापूर्वी पत्नीचेही निधन झाले त्यामुळे ते एकटेच आपले जीवन व्यथीत करत होते स्वत्ता स्वयपाक करणाऱ्या भास्कररावांना वार्धक्यामुळे तोही करणे अवघड झाले शेजारी त्यांना जेवण बनवून द्यायला मदत करत होते पण असे किती दिवस चालवणार याचा विचार करून मुलानीच त्यांचे नाव मनपाडळे ता. हातकंणगले येथील सागर वाघमारे यांच्या विवाह संस्थेत नोंदवले.
भास्कर गायकवाड यांच्या विवाह संदर्भात दाखल प्रस्तावावर सागर वाघमारे यांनी अवनी ट्रस्ट कोल्हापूर येथे असलेल्या ६५ वर्षाच्या कमल नामदेव पाटील यांच्याकडे विचारणा केली. त्यानुसार भास्कर गायकवाड आणि कमल पाटील यांचा विवाह ठरला. कमल पाटील या मुळच्या सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील आहेत त्यांना मुले बाळे नाहीत पती मयत होऊन दहा वर्षे झालेली आहेत त्यामुळे त्या अवनी संस्थेत गेल्या आठ वर्षापासून त्या राहत आहेत.
अवनी संस्था आणि भास्कर गायकवाड यांच्या नातेवाईकांशी बोलणी झाल्यानंतर आठ दिवसात ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप देत या दोघांचा विवाह सोहळा घरगुती पद्धतीने जाखले येथे थाटात पार पडला.
मुलानी विवाह संस्थेत नोंदणी केली वधूचाही शोध लागला सर्व नातेवाईक एकत्र आले बोलणी यशस्वी करून लग्न ठरल्याची बातमी सर्वत्र पसरली आठच दिवसात या लग्नाला मूर्त स्वरूप देण्यासाठी नातेवाईकासह आप्तेष्ठ परिवार ग्रामस्थ व्हऱ्हाड म्हणून उपस्थित राहिले वडील मुलांचे लग्न लावून देतात इथे मात्र मुलानीच वडिलांचा विवाह सोहळा साजरा केला या अनोख्या विवाह सोहळ्याचे मात्र वारणा परिसरात कौतुक होऊ लागले आहे.
यावेळी भास्कर गायकवाड यांची मुलगी केखले गावच्या माजी सरपंच उषा कांबळे,जयश्री मोहिते, मीना कांबळे, बेबी हिरवे, शोभा कांबळे, लता शिंदे, सुनिता गायकवाड, आनंदा गायकवाड, विश्वास गायकवाड,तानाजी गायकवाड, बाजीराव गायकवाड यासह ग्रामस्थ, नातेवाईक उपस्थित होते.